Pune BJP : फडणवीसांनी पूजा महेश लांडगेंना कोणती गुरुकिल्ली दिली?

Devendra Fadnavis : ''शरीराप्रमाणेच महेशदादांचे कार्यक्रमही भव्यदिव्यच असतात...''
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

पिंपरी : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या देशातील सर्वात मोठ्या इंद्रायणी थडी महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी या जत्रेच्या आयोजिका शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा आणि आ.महेशदादांच्या पत्नी पूजा यांना एक गुरुकिल्ली दिली.

आयोजक म्हणून पूजा यांना दोन शब्द बोलण्याची विनंती यावेळी सूत्रसंचालकाने केली. मात्र, ती त्यांनी नम्रपणे नाकारीत पुढील वर्षी बोलेल, असे सांगितले. हा धागा पकडीत फडणवीसांनी आपल्या भाषणात पूजाताईंना गुरुकिल्ली तथा गुरुमंत्र दिला. भाषण करताना समोर फक्त महेश लांडगे बसले आहेत, असे समजून तुम्ही बोला, असे त्यांनी महेशदादांच्या पत्नीला सुचविले. यावर उपस्थितांत हस्याची लकेर उमटली.

Devendra Fadnavis
Congress : पटोलेंची डोकेदुखी वाढली; तांबेंच्या समर्थनार्थ पहिला राजीनामा : काँग्रेसमध्ये दोन गट

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर आ.लांडगेंनी दीड कोटी रुपयांची बक्षिसे असलेली व पाच दिवस चाललेली देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरवली होती. त्यावेळी त्यांनी स्वता:साठी आणि फडणवीस यांच्याकरिताही खास ड्रेस शिवला होता. तो त्यावेळी फडणवीसांनी घातलाही होता. त्याची आठवण सांगत यावेळीही महेशदादांनी आपल्यासाठी त्यांच्यासारखाच संपूर्ण भगवा ड्रेस शिवला असता, तर तो यावेळीही घातला असता, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Prakash Ambedkar : 'वंचित' भविष्यात भाजपसोबतही आघाडी करू शकते : आंबेडकरांचं सूचक वक्तव्य!

ज्या देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेत महिलांना स्थान दिले, त्या देशांची प्रगती झाली, अर्थव्यवस्था काहीपटीने वाढली, असे सांगत सांभाळण्याचा, नियोजनाचा उपजत गुण महिलांत असतो, या शब्दांत त्यांनी महिलाशक्तीचे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी, स्वावलंबनाकरिता इंद्रायणी थडी करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतूक केले. त्याचवेळी पुरुषांच्या हाती पैसा आला, तर ते त्याचे काय करतील, याचा नेम नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Devendra Fadnavis
Maharashtra Cabinet expansion : जळगावातून मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कुणाची वर्णी लागणार?

तर, महेशदादा जे काही करतात, ते सर्वच त्यांच्या शरीराप्रमाणे भव्यदिव्य असतं, या शब्दांत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आ.लांडगेंच्या यशस्वी मेगा इव्हेंट कार्यक्रमांवर स्तुतीसुमने उधळली. हे सर्व कार्यक्रम आपल्या कार्यकर्त्यांमुळेच यशस्वी होतात, असे सांगत त्याचे श्रेय आ.लांडगेंनी स्वत: न घेता ते आपल्या कार्यकर्त्यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com