Maharashtra Cabinet expansion : जळगावातून मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कुणाची वर्णी लागणार?

Chimanrao Patil : आमदार किशोर पाटील, चिमणराव पाटील, की लता सोनवणेंना मिळणार संधी
Chimanrao Patil, Lata Sonavane, Kishor Patil
Chimanrao Patil, Lata Sonavane, Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Cabinate expansion : राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी केली आहे. त्यामुळे लवकरच तो होण्याचे संकेत आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून शिंदे गटातील किशोर पाटील, चिमणराव पाटील व लता सोनवणे (Lata Sonvane) यापैकी कुणाला संधी मिळणार याकडेच आता लक्ष आहे.

दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री व पक्षाचे नेते अमित शहा यांच्याशी विस्तारावरच चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मंत्री मंडळविस्तार लवकरच करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) केल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार फुटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव जिल्ह्यातून चांगली साथ मिळाली आहे. शिवसेनेचे चारही आमदार फुटले, शिवाय पाठींबा देणारे आमदारही सोबत गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात विधानसभेत शिवसेना (Shivsena) शून्य झाली आहे.

Chimanrao Patil, Lata Sonavane, Kishor Patil
Congress : पटोलेंची डोकेदुखी वाढली; तांबेंच्या समर्थनार्थ पहिला राजीनामा : काँग्रेसमध्ये दोन गट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या टप्प्यात शिंदे गटात प्रवेश केलेले तात्कालीन मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना कॅबीनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यानंतर त्यांच्याकडे जुनेच खाते ठेवण्यात आले. भविष्यात विस्तारात एका जणाला आणखी संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

आता मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील (Chimantao Patil), पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील कि चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Chimanrao Patil, Lata Sonavane, Kishor Patil
Uddhav Thackeray News : राठोड, कदम, गोगावलेंनंतर आता दादा भुसेंचा नंबर; ठाकरेंनी डाव टाकला

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटचे आहेत. अनेक वेळा त्यांच्या आमंत्रणावरून ते पाचोरा येथेही आले आहेत. मुख्यमंत्री बनण्यासाठी पाचोरा येथील एका देवस्थानाचा कौलही घेण्यासाठी एकनाथ शिंदे पाचोऱ्यात अचानक आले होते. आमदार किशोर पाटील यांचे त्यांना सहकार्य होते. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Chimanrao Patil, Lata Sonavane, Kishor Patil
Raut VS Kesarkar : दीपक केसरकरांनी खुर्चीसाठी नारायण राणेंची लाचारी पत्करली : खासदार राऊतांचा हल्लाबोल

पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनाही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनेचे सर्वात जेष्ठ आमदार आहेत. शिवसेनेत असताना मंत्रीपद मिळण्याची त्यांना अपेक्षा होती, मात्र त्यांना ती मिळाली नाही. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जे आमदार होते त्यात पहिल्या टप्प्यात चिमणराव पाटील हे सुध्दा होते. त्यामुळे आता त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा असून त्यांचे नावही चर्चेत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे जिल्ह्यातील दुसरे मंत्री कोण होणार? याकडेच जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com