अजित पवारांनी पंतप्रधान मोदींसमोरच व्यासपीठावरून राज्यपालांना सुनावलं!

राज्यात अलीकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत असल्याची तक्रार पवारांनी पंतप्रधानांकडे केली.
PM Narendra Modi, Ajit Pawar
PM Narendra Modi, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रविवारी पुणे मेट्रोसह (Pune Metro) विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींसमोबरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना शिवाजी महाराजांच्या वक्तव्याविषयी सुनावलं. राज्यात अलीकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत असल्याची तक्रार पवारांनी पंतप्रधानांकडे केली.

कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोणी विचारले असते, असे कोश्यारी म्हणाले होते. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह विविध शिवप्रेमी संघटनांनी कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलन केलं.

PM Narendra Modi, Ajit Pawar
...अन् फडणवीसांनी अजितदादांना पंतप्रधान मोदींच्या शेजारी उभं केलं!

पवार यांनी व्यासपीठावरून याचा थेट उल्लेख न करता राज्यपालांना सुनावले. अजित पवार म्हणाले, राज्यात अलीकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत केली जात आहेत. महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीला पटलेल्या नाहीत, मान्य नाहीत. शिवाजी महाराज, जिजाऊंनी हे राज्य स्थापन केलं. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी सत्यशोधक विचार माडंले. त्यांच्या विचारांचा मोठा वारसा आहे. त्याचे पालन केले पाहिजे. याबद्दल मनात आकस न ठेवता त्यांचा वासरा पुढे न्यायचा आहे. तसेच विकास कामांत राजकारण न करता महामानवांचे विचार पुढे न्यायचे आहेत, असे पवार म्हणाले.

PM Narendra Modi, Ajit Pawar
PM मोदींचे विमान पुण्यात उतण्यापूर्वीच महापौर मोहोळांवर ओढावली नामुष्की

...अन् फडणवीसांनी अजितदादांना पंतप्रधान मोदींच्या शेजारी उभं केलं!

मोदी यांनी रविवारी हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गरवारे कॉलेज ते आनंदनगर असा पाच किलोमीटरचा प्रवासही केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. मेट्रो स्थानकाचे उदघाटन होत असताना फडणवीस हे अजितदादा आणि शिंदे यांची विशेष काळजी घेताना दिसून आले. नरेंद्र मोदी यांच्या यांनी बटन दाबून मेट्रोची सुरूवात केली. यावेळी सुरूवातीला त्यांच्या शेजारी फडणवीस उभे होते. पण मागून अजित पवार आणि एकनाथ शिंदे आल्याचे पाहताच फडणवीस यांनी पवारांना मोदींच्या शेजारी उभे केले. तर शिंदे यांनाही दादांच्या शेजारी जागा देऊन ते बाजूला उभे राहिले. उद्घाटनावेळीही दोघांचाही मान ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते.

पुणे दौऱ्यातील मुख्य कार्यक्रमातही अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे नेते शेजारी बसले होते. अधूनमधून दोघांमध्ये चर्चाही होत होती. महाविकास आघाडी सत्तेत येण्यापूर्वी फडणवीस आणि पवारांचा पहाटेचा शपथविधी बराच गाजला होता. या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट झाला होता. पण त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या अन् आघाडी सत्तेत आली. सध्या राज्यात महाविकास आघाडीविरूध्द भाजप असा जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यातच हा कार्यक्रम होत असल्याने भाजपने जोरदार तयारी केली आहे. पण फडणवीस यांनी पवार, शिंदेंची विशेष काळजी घेतल्यानं त्याचीही चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com