

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती करता येणार नाही. या लढती मैत्रिपूर्ण होतील, आपण एकमेकांविरुद्ध बोलणार नाही, टिकाटिप्पनी करणार नाही, असे आम्ही ठरवले होते. आम्ही शेवटपर्यंत पाळले, पण अजित दादांनी शब्द पाळला नाही, ते का पाळले मला माहिती नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
गोखलेनगर येथील प्रचार सांगता सभेनंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह सर्व महत्त्वाच्या शहरांमधील लोकांनी भाजपला निवडून देण्याची मानसिकता झाली आहे. कोणी काहीही बोलले सांगितले तरीही ही मानसिकता बदलणार नाही, भाजपला (BJP) निवडून देण्याचे ठरवले आहे. शिवाजीनगर मतदारसंघात सभा घेतली की ती शुभ ठरते. त्यामुळे मी इथे सभा घेतली.
आमचा मागचा कारभार बघितला तर आम्ही विरोधकांनाही सोबत घेतो, दादा आमचे पुण्यामध्ये विरोधक आहेत, बाकी ते विरोधक नाहीत. दोन राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का यावर आत्ताच चर्चा करायची नाही. ते 29 पैकी 2 महापालिकांमध्ये एकत्र आहेत, तर 27 ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. हिंदीमध्ये ‘कब बाप मरेगा और कब बैल बटेगा’ अशी म्हण आहे. त्यांच्यात अजून काहीच झाले नाही तर त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. अजित दादा वारंवार दिल्लीला जातात, पण ते आमच्याच नेत्यांना भेटतात त्यामुळे मी आनंदी आहे, काही प्रॉब्लेम नाही.
काल मी पुराव्यासह हिंदी सक्ती उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कसे आणले, दोन वेळा निर्णय केले हे समोर आणले. राज ठाकरे तुमचे आता तुमच्या बंधुंसोबत तुमचे आता पटत आहे, आपल्या मराठी भाषेवर संकट आणणारे तुमचेच बंधू आहेत. त्यांना तुम्ही विचारले पाहिजे. मी बसवलेला, झोपलेला, उठवलेला मुख्यमंत्री आहे का यापेक्षा मला राज्याच्या जनतेने तीन वेळा मुख्यमंत्री केले, दोन वेळा पूर्ण बहुमत दिले. जनता कोणाच्या बाजूने आहे हे कळते. राज ठाकरे मतचोरीवर बोलू नये. राज ठाकरे यांचे आठ नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी चोरून नेले होते. ते आता त्यांच्यासोबत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.