Pune ZP Election : अजितदादांना पुणे जिल्ह्यात उघडपणे नडलेल्या नेत्याचा भाजपप्रवेश ठरला : जिल्हा परिषदेत 'ऑपरेशन लोटस'ला बळ

Pune ZP Election : इंदापूरमधील राष्ट्रवादी बंडखोर प्रदीप गारटकर भाजपमध्ये जाणार असून, यामुळे पुणे जिल्हा परिषदेत भाजपच्या ऑपरेशन लोटसला मोठे बळ मिळणार आहे.
Former NCP leader Pradeep Gartkar is set to join the BJP after Indapur rebellion.
Former NCP leader Pradeep Gartkar is set to join the BJP after Indapur rebellion.Sarkarnama
Published on
Updated on

Pune ZP Election : इंदापूर नगरपालिका निवडणुकीत बंडखोरी केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपप्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. मागील काही दिवसांपासून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती, ती आता खरी ठरताना दिसत आहे. या प्रवेशामुळे पुणे जिल्हा परिषदेत भाजपच्या 'ऑपरेशन लोटसला' इंदापूर तालुक्यातून बळ मिळू शकते.

कधीकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी प्रदीप गारटकर यांची ओळख होती. पण इंदापूरच्या नगराध्यक्षपदासाठी 'आयात’ उमेदवाराला विरोध दर्शवून त्यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली.

गारटकर यांच्या पाठिंब्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकत्र आले. गारटकर, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रवीण माने यांनी कृष्णा-भीमा आघाडीच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी’पुढे आव्हान निर्माण केले होते. या सगळ्या घडामोडी म्हणजे एकप्रकारे अजित पवार यांनाच आव्हान मानले गेले.

Former NCP leader Pradeep Gartkar is set to join the BJP after Indapur rebellion.
NCP manifesto for Pune : पुणेकरांना मेट्रो अन् पीएमटीचा प्रवास फुकट, पाणी, ट्रॅफिक अन् प्रदुषणावर कायमचा तोडगा : अजितदादा अन् सुप्रियाताईंचा एकत्रित वादा!

निकालात गारटकर यांचा पराभव झाला. पण त्यानंतर ते लगेचच अजित पवार यांच्याशी जुळवून घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होतील अशी शक्यता होती. मात्र आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचीही माहिती आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे सांगितले जाते.

Former NCP leader Pradeep Gartkar is set to join the BJP after Indapur rebellion.
Pune ZP Election : पुण्यात भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर : अजितदादांची मध्यरात्री भेट; जिल्हा परिषदेत झटका देण्याची तयारी

अजितदादांकडून 3 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती :

नुकतीच अजित पवार पुणे ग्रामीणसाठी 3 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड यासाठी संभाजी होळकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. भोर, मुळशी आणि मावळ यासाठी विठ्ठल शिंदे आणि शिरूर, जुन्नर, खेड, आंबेगाव या भागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र कोरेकर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. याच नियुक्त्यांनंतर गारटकर यांचा राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश होणार नसल्याचे निश्चित झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com