Murlidhar Mohol : देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा डॉक्टर झाले अन् मुरलीधर मोहोळ त्यांना मुख्यमंत्री करून मोकळे झाले!

Devendra Fadnavis double Doctor : जाणून घ्या नेमकं काय घडलं, राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण
Murlidhar Mohol and Devendra Fadanavis
Murlidhar Mohol and Devendra FadanavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळांचे भाजपचे ताकदवान नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड विश्‍वास आणि तेवढीच निष्ठाही. फडणवीस दुसऱ्यांदा डॉक्टर झाले; अर्थात, त्यांन डॉक्टरेट मिळाली. म्हणजे, फडणवीस हे डबल डॉक्टर ठरले. फडणवीसांना डॉक्टरेट मिळण्यावरून मोहोळांचा खूपच आनंद झाला, सोशल मीडियावरून मोहोळांनी आपला आनंद वाटला. पण, फडणवीसांचे अभिनंद आणि कौतुक करताना मोहोळांनी फडणवीसांना थेट मुख्यमंत्रीच करून करून टाकले.

थोडक्यात काय तर मोहोळांनी डॉ. फडणवीसांचे अभिनंदन केले. तेव्हाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आला असून, हा क्षण सर्वांसाठी अभिमानाचा असल्याचे जाहीर करून मोहोळ(Murlidhar Mohol) मोकळे झाले. मुळातच फडणवीस आणि याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही डॉक्टरेट मिळाल्याने विरोधक टीका करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Murlidhar Mohol and Devendra Fadanavis
Kasba Constituency : 'कुणीबी येऊ द्या, मी...' ; बावनकुळेंच्या दाव्यावर धंगेकरांचा पलटवार

फडणवीसांना(Devendra Fadnavis) डॉक्टरेट मिळाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे कॅबिनेट डॉक्टर असल्याची जळजळीत टीका केली आहे. त्याला भाजपचे नेते उत्तर देऊन राऊतांचा समाचार घेत आहेत. या गोंधळात मोहोळांनी फडणवीसांना थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसविल्याने आता विरोधकांचे नव्हे; तर सरकारमधील भाजपच्या मित्र पक्षांचेच पित्त खवळण्याची चिन्हे आहेत.

पुण्याच्या राजकारणातून दिल्लीत धडक मारण्याच्या तयारीत असलेल्या मोहोळ यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री करून वादाला तोंड फोडले आहे. मात्र, ते अजाणतेपणातून घडले नसावे, हे खरेच असावे. मात्र, मोहोळ पुन्हा चर्चेत येणार हेही नक्कीच. हे मोहोळांना चांगले ठाऊक असावे, हेही तितकेच पक्के आहे.

Mohol Tweet
Mohol TweetSarkarnama

मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर अगोदर फडणवीसांना मुख्यमंत्री संबोधून अभिनंदन केल्यानंतर, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले. यानिमित्त मुरलीधर मोहोळांचीही फडणवीसांच्या प्रती असणारी निष्ठा पुन्हा एकदा जगजाहीर झाली, कदाचित या भावना त्यांना जिथपर्यंत पोहचवायच्या होत्या तिथपर्यंत पोहचल्याही असतील. त्यानंतर मात्र मोहोळ यांनी आपल्या ट्वीटमध्ये बदल करत मुख्यमंत्र्यांच्या जागी फडणवीसांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केल्याचे आता दिसत आहे.

Murlidhar Mohol and Devendra Fadanavis
Sanjay Raut: 'बाबरीचे घुमट कोसळल्यावर पळून जाणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये'; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

भाजप नेत्यांकडून वारंवार कधी जाहीरपणे कधी खासगीत विविध प्रकारे देवेंद्र फडणीसांचा मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला जात असल्याचे दिसून आले आहे. या अगोदर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनीही जाहीर कार्यक्रमात फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याबाबत विधान केलेलं आहे.

ज्यावर महायुतीमधी त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्यामुळे स्वत: फडणवीस जरी मुख्यमंत्रिपदाबाबत दावा करताना दिसत नसले तरी भाजप नेत्यांच्या मनातील इच्छा मात्र काही केल्या लपून राहिलेली नाही, हेच खरे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com