Pune News : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या पराभव केला आणि भाजपचा अभेद्य बुरूज ढासळला. हा पराभव भाजपच्या स्थानिक नेत्यांसह राज्यपातळीवरील नेत्यांना फारच जिव्हारी लागला होता. त्यामुळे पराभवानंतर लगेचच आत्मचिंतन करून कसबा जिंकण्याचे नियोजन भाजपकडून सुरू करण्यात आले होते. हेमंत रासने हे देखील पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे मतदारसंघात अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहेत. (Challenge-counter-challenge between Bawankule-Dhangekar from Kasba Constituency)
विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव विसरून हेमंत रासने पुन्हा एकदा कसबा जिंकण्याच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. आता त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुष्टी दिल्याचं बोलले जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कसबा मतदारसंघात महाराष्ट्रातील नमो चषक स्पर्धेच्या नोंदणीची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी बावनकुळे बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बावनकुळे म्हणाले, पोटनिवडणुकीत रासने यांचा काही मतांनी पराभव झाला, तरीसुद्धा त्या दिवसांपासून पराभवाची चिंता न करता ते आता जिद्दीने काम करत विजयाकडे वाटचाल करत आहेत. येत्या काळात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते निश्चित यश मिळवतील.
रासने हे अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिकपणे धर्मनिष्ठने काम करणारे नेते आहेत. बावनकुळे यांच्या या वक्तव्याने हेमंत रासने यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्याने कसबा भाजपात नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बावनकुळेंच्या त्या विधानावर आमदार रवींद्र धंगेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धंगेकर म्हणाले की, 'भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा हेमंत रासने यांना मैदानात उतरवणार असल्याचे सांगितले आहे. ते त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी बोलल्यामुळे रासनेंना तिकीट मिळेल. त्यामुळे ते पुन्हा मैदानात आले तरी जनता ठरवेल की कुणाला निवडून द्यायचं, त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात कुणीही उतरलं तरी मी तयारच आहे', असेही धंगेकर यांनी स्पष्ट केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.