Devendra Fadnavis : महापालिकेच्या निवडणुकांबाबत फडणवीसांचे महत्त्वपूर्ण संकेत; म्हणाले..

Devendra Fadnavis On Local Body Election : कधी होणार पुणे- मुंबई महानगरपालिकेची निवडणूक?
Devendra Fadnavis On Local Body Election :
Devendra Fadnavis On Local Body Election : Sarkarnama

Pune News : मागील अनेक काळापासून महानगर पालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. आता या निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात त्यांनी आता शक्यता वर्तवली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होऊ शकतात, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांनी पुण्यात बोलताना हे वक्तव्य केले आहे.

Devendra Fadnavis On Local Body Election :
Shahaji Patil New: सांगोल्यात पुन्हा लाल दिव्याची चर्चा : आमदार शहाजीबापू म्हणतात ‘संधीचे सोने करेन...

पुण्यामध्ये भाजपचे शहरा्ध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, "महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबर नोव्हेंबर होऊ शकतात."

Devendra Fadnavis On Local Body Election :
Division Pune District : पुणे जिल्ह्याचं विभाजन करणार का? ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

उद्धव ठाकरेंवर टीका :

"जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पुन्हाआपलं सरकार आलं. खरं म्हणजे 2019 ला जनतेने आम्हाला निवडून दिलं होतं. त्यावेळी आपण युतीमध्ये लढलो. जनतेने युतीला 170 जागा दिल्या. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने खुर्चीसाठी विचार सोडला. त्यांना खुर्चीचा एवढा मोह झाला होता की, विचार सोडून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात अभद्र असं महावसूली सरकार आलं ", अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com