ShahajiBapu Patil News: सांगोल्यात पुन्हा लाल दिव्याची चर्चा : आमदार शहाजीबापू म्हणतात ‘संधीचे सोने करेन...

Shinde - Fadnavis Government: "मला गेल्या अनेक वर्षाच्या कामाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे"
ShahajiBapu Patil
ShahajiBapu Patil Sarkarnama

सांगोला : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आता सांगोल्यातही लाल दिव्याच्या गाडीची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात प्रसिद्धीच्या झोकात आलेले आमदार शहाजी पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल, अशी अशा कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांमध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा समावेश होता. या बंडामध्ये आमदार शहाजी पाटील यांचे 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटील..' हा डायलॉग मोठा गाजला. शिवसेनेच्या बंडाची एकीकडे चर्चा होत होती. तर दुसरीकडे आमदार शहाजी पाटील हे त्यांच्या या डायलॉगमुळे चांगलेच चर्चेत आले.

ShahajiBapu Patil
Pune News: "'मविआ' सरकार घालवण्यासाठी घरी बसायलाही तयार होतो; पण पक्षाने मला सन्मानित करून उपमुख्यमंत्री केलं"

सध्या शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यक्रमात आमदार शहाजी पाटील यांचे उपस्थिती आणि भाषणं लक्षवेधी ठरत आहेत. त्यांना अनेक ठिकाणी सभेसाठी बोलवले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आमदार म्हणून शहाजी पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. तर शहाजी पाटील यांनी सांगोल्यासाठी सर्वच विभागात मोठा निधीही आणला आहे.

विधानसभा निवडणुकीत परंपरागत शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेला सांगोला विधानसभेची जागा अल्पमतात खेचून आणल्यापासून त्यांच्या मंत्रीपदाबाबत चर्चा सुरू झाली होती. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती.

सध्या सुप्रीम कोर्टाच्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. या विस्तारामध्ये आमदार शहाजी पाटील यांना मंत्रीपद दिले जाईल व सांगोल्याला लाल दिव्याची गाडी पुन्हा मिळेल, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

ShahajiBapu Patil
ACB Trap News: नाशिकच्या सहकार विभागात खळबळ; जिल्हा निबंधकाला तब्बल 30 लाखांची लाच घेताना अटक

लाल दिवा ओके होईल का?

राज्य मंत्रिमंडळात सांगोला आणि मंत्री यांचं नातं तसं अल्प कालावधीसाठीच राहिलं गेलं आहे. 1978-80 मध्ये शरद पवार यांच्या पुलोत सरकारमध्ये स्व.गणपतराव देशमुख यांना कृषी विधी व न्याय खात्याचे मंत्रीपद मिळाले होते.

त्यानंतर त्यांनाच 1999-2000 मध्ये आघाडी सरकारच्या कालावधीत 'पणन व रोजगार हमी' खात्याचे मंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर सांगोल्याला मंत्रिपदाचा वनवास सहन करावा लागत आहे. सध्या आमदार शहाजी पाटील यांच्या रूपाने पुन्हा मंत्री पदाबाबत चर्चा सुरू झाली असून सांगोल्याला लाल दिव्याचा वनवास संपेल, अशी आशा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

ShahajiBapu Patil
Pimpri-Chinchwad : खासदार कोल्हेंना धमकी देणाऱ्या पोलिसाला आयुक्तांनी पाठवले घरी

मंत्रीपद मिळाले तर...

"सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारकडून सांगोला विधानसभेसाठी निधी व महत्त्वाची कामे होत आहेत. मला गेल्या अनेक वर्षाच्या कामाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. कार्यकर्त्यांना मी नामदार व्हावे, असे निश्चितपणे वाटत असेल पण मला सांगोल्याला कामांच्या बाबतीत वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचे आहे. याबाबत मी सतत काम करीत आहे व राहणार. मंत्रीपद मिळाले तरी संधीच सोने करीन", अशी प्रतिक्रिया आमदार शहाजी पाटील यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com