Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : मोठी बातमी! निकालापूर्वीच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; काय आहे कारण?

MNS In Mahayuti : लोकसभा निडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलचे आकडे महायुतीला धक्का देणारे आहेत. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Devendra Fadnavis, Raj Thackeray
Devendra Fadnavis, Raj ThackeraySarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी शिवतीर्थ जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. लोकसभेचा निकाल काही तासांवर आला असताना फडणीस-राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या आहे. या भेटीचे नेमके कारण काय हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी अनेक चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलचे आकडे महायुतीला धक्का देणारे आहेत. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आधीच जागा वाटपात महायुतीत मोठी रस्सीखेच झाली होती. त्यानंतर महायुतीला फटका बसत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी ही युती विधानसभा निवडणुकीत टिकणार की नाही, यावरही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

लोकसभेत शिंदे गट आणि अजित पवार गटाला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. तसेच भाजपलाही याची झळ सोसावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. या स्थितीत मनसे विधानसभा निवडणुकीत महायुतीत राहणार की नाही हे सुद्धा उद्याच्या निकालानंतर ठरण्याची शक्यता आहे. तत्पुर्वीच ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ही भेट सदिच्छा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊनही राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसेंची उमेदवार जाहीर करून टाकली. मात्र भाजपनेही तेथून निरंजन डावखरे यांना सिटिंग आमदार म्हणून पुन्हा रिंगणात उतरवले आहे. यावर फडणीसांनी ठाकरेंशी चर्चा केल्याचे माहिती आहे. आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, ते लवकरच स्पष्ट होईल.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis, Raj Thackeray
Jogendra Katyare Dismiss: 'लेटरबॉम्ब' अंगलट; खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे बडतर्फ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com