Jogendra Katyare Dismiss: 'लेटरबॉम्ब' अंगलट; खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे बडतर्फ

Jogendra Katyare Update News : 'राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून कलेक्टर माझा मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे.
Dilip Mohite Patil, Suhas Diwase, Jogendra Katyare
Dilip Mohite Patil, Suhas Diwase, Jogendra KatyareSarkarnama

Pune News : खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या बदलीचे मागणी करत थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. दिवसेंच्या बदलीची मागणी करतानाच कट्यारेंनी अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहितेंवरही (Dilip Mohite) गंभीर आरोप केले होते. या 'लेटरबॉम्ब'मुळे एकच खळबळ उडाली होती.

पण आता या 'लेटरबॉम्ब' प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला अवघे काही तास उरले असतानाच खेडच्या प्रांताधिकाऱ्यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना बडतर्फ केले आहे.

निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर सुहास दिवसेंची बदली होण्याऐवजी थेट जोगेंद्र कट्यारे यांनाच बडतर्फ करण्यात आलं. त्यांच्या जागी सारथीचे उपजिल्हाधिकारी अनिल पवारांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.विभागीय आयुक्त सी.एल.पुलकुंडवार यांनी याबाबतचा अध्यादेश काढला आहे.

पुण्याचे 'कलेक्टर' सुहास दिवसेंमुळं माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलीये, अशा मजकुराचा लेटर बॉम्ब टाकून खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी खळबळ उडवून दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्यानं राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

Dilip Mohite Patil, Suhas Diwase, Jogendra Katyare
Hingoli Lok Sabha News : आलटून पालटून खासदार देणारे हिंगोलीकर आता कोणाला देणार दिल्लीची संधी ?

'राष्ट्रवादी अजित पवार Ajit Pawar गटाच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून कलेक्टर माझा मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे रिंग रोड कामाबाबत चौकशी समिती लावून या चौकशीत आपणास गुंतवून ठेवले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची चुकीची कामं आणि आर्थिक मागणी पूर्ण करत नसल्याने माझ्याविरोधात वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. आता हे सर्व सहन होत नसल्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे कट्यारेंनी पत्रात नमूद केले आहे.

Dilip Mohite Patil, Suhas Diwase, Jogendra Katyare
Bharti Pawar Vs Bhaskar Bhagre: गावित फॅक्टर निकाल फिरवणार: कांदा कुणाला रडवणार भास्कर भगरे की भारती पवारांना...

आमदार मोहिते काय म्हणाले..?

आमदार दिलीप मोहिते देखील आता चांगलेच संतापले आहेत. मोहितेंनी या वादावर जोरकस प्रतिक्रिया दिल्यानं दिवसे-कट्यारे वादाला राजकीय फोडणी मिळाली.'भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आपण कायम आवाज उठवतो. अशा लोकांची चौकशी झालीच पाहिजे. आता 'दूध का दूध और पानी का पानी होऊनच द्या, अशा शब्दांत चॅलेंज करत मोहितेंनी अधिकाऱ्यांमधील वाद पेटवण्याचा प्रयत्न केला. आपण दिवसेंना काहीच सांगितलं नसून कट्यारेंविरोधात काही करण्याचा माझा अजिबात संबंध नसल्याचे आमदार मोहितेंनी सांगितले.

Dilip Mohite Patil, Suhas Diwase, Jogendra Katyare
Unmesh Patil: उन्मेष पाटलांच्या खेळीनंतर जळगावात कोणाचा होणार गेम?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com