Devendra Fadnavis : पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis Pune airport name Sant Tukaram Maharaj : विमानतळाला संत तुकाराम महाराज याचे नावे देण्याची संकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्यावर तात्काळ काम आम्ही सुरू केलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याविषयी सुतोवाच मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले होते. त्यानंतर आज (शनिवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव करून तो केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचे जाहीर केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव पुणे विमानतळाला देण्याचा प्रस्ताव सरकारला दिला होता. तो आम्ही स्वीकारला आहे. कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल

विमानतळाला संत तुकाराम महाराज याचे नाव देण्याची संकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्यावर तात्काळ काम आम्ही सुरू केलं आहे.जगदगुरू तुकाराम महाराजांचं नाव विमानतळाला दिले तर त्याचा सगळ्यांना आनंद होईल,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Thackeray Vs Thackeray : वरळी विधानसभा मतदारसंघात होणार हायव्होल्टेज लढत?

आम्ही मंजुर केलेलं प्रस्ताव केंद्रात मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि नितीन गडकरी यांची असेल असे देखील फडणवीसांनी यांनी सांगितले.

दरम्यान, पुण्यातील एका कार्यक्रमात बोलातना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील.

Devendra Fadnavis
Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठाची निवडणूक ठरल्याप्रमाणेच होणार ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com