Devendra Fadnavis : पंढरपूरकडे निघालेल्या फडणवीसांचा पुण्यात थांबा ; बागेश्वरधाम बाबांच्या चरणी लीन होत म्हणाले...

Bageshwar Dham Dhirendra Shastri : " बागेश्वर बाबा पुण्यात आले हे या शहराचे भाग्य..."
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

चैतन्य मचाले-

Pune News : धीरेंद्रशास्त्री अर्थात बागेश्वर धाम हे नेहमीच त्यांच्या विधान आणि भव्य दरबारामुळे चर्चेत असतात.त्यांच्या दरबारात अनेक राजकीय नेतेही आपली हजेरी लावताना दिसत आहे. त्यांच्या कार्यक्रमावरुन अनेक दावे - प्रतिदावेही केले जातात.पण याच बागेश्वर धाम बाबांनी मराठा आरक्षणाला पाठींबा जाहीर केला आहे. तसेच संत तुकाराम महाराजांचे दर्शनही घेत यापूर्वी केलेल्या वक्तव्यावरुन जाहीर माफीही देखील मागितली आहे. याचदरम्यान, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनीही पुण्यात बागेश्वरधाम बाबांचे दर्शन घेतले.

पुण्यात संगमवाडी येथे माजी आमदार आणि भाजप नेते जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रशास्त्री यांच्या हनुमान कथा आणि दरबार कार्यक्रम होत आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या या कार्यक्रमाला सामाजिक,राजकीय तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्यासाठी निघालेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात बागेश्वर बाबांचे दर्शन घेतले.

Devendra Fadnavis
Dhirendra Krishna Shastri: आधी आक्षेपार्ह वक्तव्य; नंतर माफी अन् आता दर्शन...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी बागेश्वर बाबा यांच्या कामाचे कौतुक केले.ते म्हणाले,सनातन म्हणजे जातीयवाद, परंपरावाद असे काहीजण म्हणतात. पण त्यांना सनातनचा अर्थच कळलेला नाही. सनातनचा अर्थ ' जे अनादी आणि अनंत आहे' ते सनातन आहे. जो सगळ्यांना एकत्र बांधणारा विश्वास आहे, या विचाराने सनातन धर्म पुढे जात आहे. बागेश्वर बाबा जेव्हा सनातन धर्माची गोष्ट करतात तेव्हा अनेक लोक त्यांना नावे ठेवतात. त्यांचा अपप्रचार करतात. बागेश्वर बाबा पुण्यात आले हे या शहराचे भाग्य आहे असेही ते म्हणाले.

बागेश्वर बाबा (Dhirendra Shastri ) सनातन धर्माची सेवा करत आहेत.ते सनातन धर्मासाठी जनजागृती करत आहेत. जर भारताची जागृती झाली तर जगाची जागृती होईल.रामलल्ला जिथे विराजमान होते तिथेच प्रभू रामाचे मंदिर बांधले जात आहे, असेही फडणवीस म्हणाले.

...म्हणून बागेश्वर बाबा यांची जाहीर माफी!

बागेश्वरबाबा यांनी देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराला भेट दिली. त्यांनी मंदिराच्या भव्य बांधकामाचे कौतुक केले.त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झो़ड उठवण्यात आली होती.

ते म्हणाले, तुकाराम महाराजांबद्दल तसं माझ्या बाचण्यात आले होते म्हणून मी ते बोललो असं ते म्हणाले. यासाठी मी पुन्हा एकदा समस्त वारकरी सांप्रदायाची माफी मागतो असं बागेश्वर बाबा म्हणाले. आज देहू येथे बागेश्वर बाबा येणार असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

(Ediited By Deepak Kulkarni)

Devendra Fadnavis
Kirit Somaiya : सारेच भ्रष्टाचारी विरोधी पक्षांत..! किरीट सोमय्यांचा अजब फंडा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com