Devendra Fadnavis : आता तुतारी कुठे वाजते, कशी वाजते ते समजेल; फडणवीसांचा टोला

Sharad Pawar At Raigad : शरद पवार शेवटी 40 वर्षांनंतर रायगडावर गेले, याचाच सर्वात जास्त आनंद
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune Political New : उपमुख्यमंत्री अजित पवारांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नेते शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष नाव देत तुतारी हे चिन्ह दिले आहे. या तुतारी चिन्हाचे शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर अनावरण केले. शरद पवारांच्या रायगडावरील या कार्यक्रमावर भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी टीका केली. तसे आता आगामी निवडणुकीत तुतारीला किती यश मिळते ते पाहावे लागेल, असा टोलाही लगावला.

आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने शरद पवारांना (Ajit Pawar) रायगडाची आठवण झाली. त्यांना ४० वर्षांत कधीही रायगडाची आठवण झाली नाही, असे म्हणत भाजपने शरद पवारांवर निशाणा साधला. तर शरद पवार (Sharad Pawar) आज रायगडावर गेले याचे खरे श्रेय अजितदादांनाच द्यावे लागेल. तसेच आता तुतारी कुठे वाजते ते पाहावे लागेल, असा टोला फडणवीसांनी लगावला. शरद पवारांना चिन्ह मिळताच महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांतील नेते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar : 'त्यांचं' आयुष्य दुसऱ्याचं घर फोडण्यात गेलं; रायगडावरून तुतारी फुंकताच पवारांवर भाजपचं टीकास्त्र

पुणे दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पवारांच्या रायगडावरील कार्यक्रमावर टीका केला. फडणवीस म्हणाले, शरद पवार शेवटी 40 वर्षांनंतर रायगडावर गेले, याचाच मला सर्वात जास्त आनंद आहे. छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षांनंतर पवार गेले, याचे श्रेय अजितदादांनाच द्यावे लागेल. आता आगामी निवडणुकांत तुतारी कुठे वाजते, कशी वाजते ते भविष्यात आपल्याला दिसेलच', असा खोचक टोलाही फडणवीसांनी पवारांना लगावला.

भाजपच्या ट्विटर हँडलवरूनही शरद पवारांवर निशाणा साधला आहे. आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने शरद पवारांना रायगडाची आठवण झाली. त्यांना ४० वर्षांत कधीही रायगडाची आठवण झाली नाही. सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्यासाठी या वयात पवारांना असे उद्योग करावे लागत आहेत. आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत शरद पवारांना रायगडावर यायला वेळ नव्हता, असा घणाघात भाजपच्या (BJP) वतीने केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Three New Criminal Laws : राजद्रोह नाही... आता देशद्रोहाचा उल्लेख..! जुलैपासून लागू होणार 3 नवीन फौजदारी कायदे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com