देवेंद्र फडणवीस शब्द पाळणार?: दौंडचा मंत्रिपदाचा ७५ वर्षांचा वनवास संपणार?

बारामतीलगतचा तालुका म्हणून आतापर्यंत दौंडला मंत्रीपदाची संधी मिळाली नसली तरी आता मंत्रीपद मिळण्यासाठी हाच मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
Devendra Fadnavis-Rahul Kool
Devendra Fadnavis-Rahul KoolSarkarnama
Published on
Updated on

केडगाव (जि. पुणे) : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल कुल (Rahul Kul) यांना मंत्रीपद देण्याचा शब्द जाहीर सभेतून दिला होता. आता राज्यात भाजपची पुन्हा सत्ता आल्याने फडणवीस आपला शब्द पाळून कुल यांना मंत्रीपद देणार की धनगर आरक्षणासाखा शब्द हवेत विरून जाणार, याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा २०१४ मध्ये बारामतीत केली होती. मात्र तो निर्णय अद्याप झालेला नाही. (Devendra Fadnavis will follow the word and give the post of minister to Rahul Kul)

बारामतीलगतचा तालुका म्हणून आतापर्यंत दौंडला मंत्रीपदाची संधी मिळाली नसली तरी आता मंत्रीपद मिळण्यासाठी हाच मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजपचे एकमेव आमदार हा मुद्दापण तेवढाच महत्वाचा मानला जात आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत हायकमांडने अखेरच्या क्षणी जसे धक्कातंत्र वापरले तसे काहीही घडू शकते.

Devendra Fadnavis-Rahul Kool
काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील नेत्यांची झाडाझडती; ११ आमदारांची गैरहजेरी; तुम्ही काय करता?

पुण्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार हे निश्चित आहे. मात्र, दुसऱ्या मंत्रीपदासाठी चढाओढ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या झंझावातामुळे पुणे जिल्ह्यात भाजपची वाताहत झाली असताना कुल यांनी भाजपचे अस्तित्व जिवंत ठेवण्यात यश मिळवले. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी भाजपला बळ द्यायचे असेल तर कुल यांचा पर्याय भाजप पक्षनेतृत्वापुढे आहे.

Devendra Fadnavis-Rahul Kool
गोपीनाथ मुंडेंच्या सांगण्यावरून मी धनंजय मुंडेंनाही मतं दिलंय : ठाकूरांनी सांगितले गुपीत

पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव, पिंपरी, इंदापूर, शिरूर, भोर, पुरंदर, मावळ या तालुक्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. दौंड तालुका अनेकदा काँग्रेस प्रणित सरकारच्या मागे राहिला. मात्र दौंडचा मंत्रीपदासाठी कधीही विचार झाला नाही. पण, गेल्या ७५ वर्षांतील दौंड तालुक्याच्या मंत्रीपदाचा वनवास आतातरी संपणार का याकडे दौंड तालुका डोळे लावून आहे. कुल यांना या आधी दोन वेळा मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. आता मंत्रीपदाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. बारामतीमुळे दूर राहिलेले मंत्रीपद बारामतीमुळेच मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis-Rahul Kool
अजितदादांनी पैसे दिले नाहीत, असे आम्ही आयुष्यात कधीही म्हणणार नाही!

राज्याच्या राजकारणात वडील, आई व मुलाला विधानसभेत काम करण्याची संधी मिळण्याची दोनच उदाहरणे आहेत. आमदार राहुल कुल आणि हर्षवर्धन जाधव यांनी हा मान मिळविला आहे. कन्नड (जि. औरंगाबाद) विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव व आई हे दोघेही पूर्वी आमदार होते. विधानसभा कामकाजाचा कुल कुटुंबीयांना २७ वर्षांचा अनुभव आहे. मात्र ते मंत्रीपदापासून अद्याप दूर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com