भरणेंना भावी आमदार म्हटल्याचा हर्षवर्धन पाटलांचा राग अजून जाईना!

इंदापूरात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची जोरदार बॅटिंग
Harshvardhan Patil, Dhananjay Munde
Harshvardhan Patil, Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

इंदापूर : इंदापूरच्या सभेत मी दत्तात्रय भरणेंना भावी आमदार संबोधले होते. त्यावर अजितदादांनी इकडच्या राजकारणाची अंडीपिल्ली कळायला वेळ लागेल असे मला म्हणाले होते. त्यानंतर मामांनाच तिकिट मिळाले. आता मलाही पवारसाहेब अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या मनातले समजायला लागले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले.

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी मेळावा झाला. त्या मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane), महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), प्रदीप गारटकर, संजय शिंदे, यशवंत माने, आदी उपस्थित होते.

Harshvardhan Patil, Dhananjay Munde
बनवाबनवीमुळेच बाबाला भरणेमामांनी दोनदा चितपट केले : अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर हल्लाबोल

या वेळी मुंडे म्हणाले, मी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून गेलो होते. तेव्हा त्यावेळच्या आमदारांनी मला विधान परिषदेसाठी मतदान केले होते. पण मी भरणेमामांना भावी आमदार म्हटले, त्याचा राग अजूनही त्यांच्या मनात आहे, असा टोला त्यांनी नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांना लगावला. शरद पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर लोकशाहीची आगळीवेगळी ओळख या देशाला करुन दिली. होत्याचे नव्हते अन नव्हत्याचे होते ही म्हण पवारसाहेबांनी खरी करुन दाखवली.

विधानसभेचा निकाल लागला त्यावेळी भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत होते. राष्ट्रवादी ५४ वर होती. काँग्रेसला ४४ जागा होत्या. मात्र, साहेबांनी ५६ असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री अन् ४४ आमदार असलेल्या काँग्रेसचे मंत्री केले. ज्याचे १०५ आमदार होते त्यांचा विरोधी पक्षनेता झाला. मी म्हणत होतो माजी मुख्यमंत्र्यांना साहेबांच्या नादी लागू नका, होत्याचे नव्हते होईल झाले, अशा शब्दांत मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Harshvardhan Patil, Dhananjay Munde
आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान ; तर राजकारण सोडेन!

अडीच वर्ष झाले महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. या अडीच वर्षात केंद्रातल्या भाजप सरकारला काय झाले माहित नाही. उठले की कोणाच्याही मागे ईडी लाव. आता त्या ईडीची किंमत आमच्या उसतोड मजूराच्या खिशातील गणेश बिडी ईतकीही राहिली नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. सरकारने ईडीची चव घातली. असेही मुंडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com