Dhananjay Munde News : कृषीमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, पुण्यातील घरी क्वारंटाईन

Corona Positive : हिवाळी अधिवेशनानंतर अस्वस्थ वाटत असल्याने केली तपासणी
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune : देशभर कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे शहरात आपल्या घरी मुक्कामी असलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. हिवाळी अधिवेशनानंतर अस्वस्थ वाटत असल्याने मुंडे यांनी टेस्ट केली होती. त्यात कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली.

Dhananjay Munde News
Maratha Reservation : भुजबळांनी जरांगेंना डिवचले, ‘तुमची 12 इंचाची छाती आहे, तब्येत सांभाळा’

नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे ट्विटद्वारे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल. सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील मुंडे यांनी केले आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरियंटमुळे रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, हा व्हेरियंट धोकादायक नसल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.केरळ राज्यामध्ये या व्हेरियंटमुळे सर्वाधिक रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

(Edited By Roshan More)

Dhananjay Munde News
Alcohol Ban :''कष्टकरी, गरिबांसाठी दारू पिणे फायद्याचे'' ; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्याचं अजब विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com