गुजरातमध्ये सरकारने राज्यात दारू बंदी लागू असतानाच नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील गिफ्ट सिटीला दारू बंदीच्या नियमातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता गिफ्ट सिटीमध्ये दारूची विक्री करता येणार आहे.
याच निर्णयावरून बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी(Jitan Ram Manjhi) यांनी बिहारमध्ये देखील गुजरातप्रमाणे दारूबंदीचे नवीन मॉडेल सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे. दारूवरील बंदी हटवल्यास राज्याच्या तिजोरीतील उत्पान्नात वाढ होईल, असा सल्लाच मांझी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जीतनराम मांझी म्हणाले की, बिहारमध्ये दारू विक्री करण्याच्या नियमांंमध्ये शिथिलता आणणे गरजेचे आहे. यासाठी ज्याप्रमाणे गुजरात सरकारने गिफ्ट सिटीसाठी दारू विक्री संदर्भात नवीन धोरण आखले आहे, त्याप्रमाणे बिहारमध्ये निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील व्यापार आणि विदेशी चलनसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.
राज्यात दारू विक्रीस जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे बिहारचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होत आहे. तसेच पर्यंटन व्यवसायाला देखील याचा मोठा फटका बसत आहे. याशिवाय दारुचे सेवण करणे हे गरीब आणि कामगार वर्गासाठी फायद्याचे असल्याचे मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे. त्यामुळे मी गुजरात सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी आभार व्यक्त करत असल्याचेही मत मांझी यांनी यावेळी व्यक्त केले.
नितीशकुमार यांनी 2005 ते 2010 या कालावधी हर घर दारू अशा पद्धतीने दारू विक्री सुरूच ठेवली होती. आता मात्र ते दारू विक्रीच्या विरोधात असल्याचा टोला मांझी यांनी नितीशकुमार यांना लगावला आहे.
दरम्यान, बिहारमध्ये 2016 पासून राज्यात दारूबंदी करण्यात आली आहे. तसेच त्याची अंमलबजावणी देखील कठोरपणे करण्यात येत असून जर कोणी दारूबंदीचे उल्लंघन केले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.