Pimpri Chinchwad News : प्रशासक राजमुळे पिंपरी-चिंचवडकरांची कोंडी; नागरिकांची थेट आयुक्तांकडे गाऱ्हाणी!

PCMC News : पिंपरी महानगरपालिकेत होत नाही पाच वर्षानंतरही दररोजच्या कामाचा निपटारा!
Pimpri Chinchwad News Pcmc
Pimpri Chinchwad News PcmcSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थात प्रशासकीय राजवट असल्याने अधिकाऱ्यांकडूनच नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा होणे अपेक्षित आहे. मात्र तो होत नसल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad News) दिसून आले आहे.

Pimpri Chinchwad News Pcmc
Satara NCP : लोकप्रतिनिधींना अपात्र करण्याचे भाजपला मिळाले नवे हत्यार : शशिकांत शिंदे

नगरसेवकांची मुदत संपल्याने त्यांच्यामार्फत नागरी समस्या मार्गी लागण्यास गेल्या वर्षभरापासून ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे प्रशासन तथा अधिकाऱ्यांनी या काळात कामाचा निपटारा करणे अपेक्षित आहे. मात्र, ते नागरिकांच्या तक्रारींची दखलच घेत नसल्याचे पिंपरी चिंचवडकरांची दुहेरी कोंडी झाली आहे.

पालिकेचे विभागप्रमुख तथा अधिकारीच दखल घेत नसल्याने रहिवासी थेट आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडू लागले आहेत. त्यातून हा गैरप्रकार समोर आला आहे. कार्यालयीन वेळेचेही अधिकारी पालन करीत नसल्यामुळे त्या दिवसाच्या कामाचा निपटारा त्याच दिवशी करण्याचे (झिरो पेन्डसी अँड डेली डिस्पोजल` ) उद्दिष्ट साध्य करण्यास प्रशासनाला अपयश आलेले आहे. त्यामुळे भेटीला येणाऱ्यांसाठी नोंदवही ठेवण्यास आणि भेटीच्या वेळेचा फलक लावण्यास प्रशासकांनी विभागप्रमुख तथा अधिकाऱ्यांना आज पुनश्च बजावले.

Pimpri Chinchwad News Pcmc
Rahul Gandhi On Savarkar : राहुल गांधींनी सावरकरांवरील ट्विट केले डिलीट; पण पवारांच्या सल्ल्याने की रणजीत सावरकरांच्या भीतीने?

अभ्यांगतांकरिता नोंदवही ठेवून भेटीच्या वेळेचा फलक लावण्याचा आदेश राज्य सरकारने सात वर्षापूर्वी (०२.०२.२०१६) काढलेला आहे.त्यानंतर दोन वर्षांनी (१५.०२.२०१८) `झिरो पेन्डसी अॅन्ड डेली डिस्पोजल` ही कार्यपद्धती सरकारने अवलंबली. मात्र, हे दोन्ही आदेश धाब्यावर बसविण्यात आले असल्याचे पिंपरी महापालिका प्रशासकांना आढळून आले आहे.ही बाब प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अशोभनीय़ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सायंकाळी चार ते पाच ही वेळ अभ्यांगतांच्या भेटीसाठी राखून ठेवण्याची आणि या कालावधीत इतर बैठका न घेण्याची वा दौरे आयोजित न करण्याची सूचना त्यांनी विभागप्रमुखांना केली आहे. तसेच या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासही त्यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com