Satara NCP : लोकप्रतिनिधींना अपात्र करण्याचे भाजपला मिळाले नवे हत्यार : शशिकांत शिंदे

Shashikant Shinde राष्ट्रवादी भवनात आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे,फडणवीस सरकार तसेच केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.
NCP MLC Shashikant Shinde
NCP MLC Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Shashikant Shinde News : एका दिवसात राहुल गांधी Rahul Gandhi यांचे खासदारकीचे पद रद्द होणे हा लोकशाहीत नवा पायंडा पहायला मिळतो. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सच्या व्यतिरिक्त सुद्धा लोकप्रतिनिधींना अपात्र करण्याचे हत्यार भाजपाला मिळाल्याची प्रचिती येत आहे, अशी खोचक टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी मोदी सरकारला लगावला आहे. जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणूका स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी भवनात आयोजित जनता दरबारानंतर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे,फडणवीस सरकार तसेच केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, साडे सहा लाख कोटींचा राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. त्यात योजनांच्या घोषणांचा सुळसुळाट होता. पण, त्याला पैसा कोठुन उभा करणार हा प्रश्न आहे. यातील बहुतांशी योजना केंद्राच्या असून त्यांच्याकडून पैसे कधी येतील त्यावर या योजनांचे भवितव्य अवलंबून आहे.

अद्यापही त्यांनी राज्याचा जीएसटी परतावा दिलेला नाही. आपण परत एकदा कर्ज काढण्याच्या बाबती निर्णय घेतला आहे. साडे सात हजार कोटीच पुरवणी बजेट त्यांनी मार्चमध्ये बजेटच्या दिवशीच आणले, म्हणजेच सरकार फेल्युलर आहे. महाविकास आघाडी सरकरने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान जाहीर केले. त्यातील पहिला टप्पा दिला आणि सरकार गेलं. पण, आताच्या सरकारच्या काळात दुसरा, तिसरा टप्प्यातील शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत. पैशाचे नियोजन कसलेही नाही. आता १२०० कोटींची तरतूद केलेली आहे.

NCP MLC Shashikant Shinde
Satara : गिरीश बापट यांच्या निधनामुळे शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द

बाजार समितीच्या निवडणुका या राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे. राहुल गांधींनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत ते म्हणाले, कालच पवार साहेबांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्या महापुरुषांंबाबत आदर्श पाहिजे. पण, आरएसएसचे विचार आणि सावकरांच्या विचारांची एकत्र सांगड घालणे चुकीचे आहे. सावरकरांच्या बाबतीत भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका आहे.

NCP MLC Shashikant Shinde
Pune Politics : कोथरूडमधूनच का लढलो; चंद्रकांतदादांनी अखेर सांगितले खरे कारण!

राहुल गांधी यांनी साडे पाच हजार किलोमीटर पदयात्रा केली. त्यांनी एकतेचा संदेश दिला. त्यांनी कुठेही जातीभेद केला नाही. त्यांनी काही आरोप केले. त्याचा खुलासा ना सरकारने केला ना सरकारच्या कोणत्या प्रतिनिधीने केला. संसदेत अदानीचा विषय घेतला. त्यावेळी राहुल गांधी यांनी संसदेच कामकाज बंद पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी संसदेत चर्चाच होवू नये असा सत्ताधाऱ्यांचा डाव होता.

NCP MLC Shashikant Shinde
Rahul Gandhi News: मोठी बातमी : सुरत न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी देणार आव्हान; काँग्रेसकडून...

ज्या मोदींनी केस टाकली त्याच मोदींनी केस विड्रॉल करण्याचे सुतोवाच केले होते. पण, तीच केस लगेच ओपन होते आणि एका महिन्यात निर्णय होतो. एका दिवसात राहुल गांधी यांचे खासदारकीचे पद रद्द होते. हा लोकशाहीचा नवा पायंडा आपल्याला पहायला मिळतो. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स व्यतिरिक्त सुद्धा आता अपात्र करण्याचे हत्यार भाजपला यामाध्यमातून मिळाले आहे, याची प्रचिती येत आहे, अशी टीप्पणी त्यांनी केली.

NCP MLC Shashikant Shinde
Patan : कोथिंबिरीची पेंडी पारखून घेता... लोकप्रतिनिधी निवडताना जागरूकता कुठे जाते...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com