Vidhan sabha Election 2024 : विधानसभेला पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील महायुतीतील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते-पाटील यांची उमेदवारी जाहीर होणेच काय तेवढं बाकी आहे. मात्र, ते पुन्हा विजयी होणार की कसे याचे संकेत गुरुवारी (ता.१०) होणाऱ्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीतून मिळणार आहे.
उद्याची ही निवडणूक आमदार दिलीप मोहिते(Dilip Mohite Patil ) यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच ठरणार आहे. यानिमित्ताने झाडून सारे त्यांचे विरोधक पुन्हा एकवटले आहेत.२०१४ ला ते एक झाल्याने मोहितेंचा त्यावेळी पराभव झाला होता. मात्र, २०१९ ला ते पुन्हा विखुरल्याने मोहिते पुन्हा आमदार झाले.आता तेच पुन्हा युतीचे उमेदवार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. फक्त आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला की शिवसेनेला सुटते, त्यावर तेथे उमेदवार त्यांचा कोण हे ठरणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीकडे मिनी आमदारकीची म्हणून पाहिले जाते. त्याच बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींची खेडला उद्या निवडणूक आहे. गेल्यावर्षी २८ एप्रिलला या समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्यात आमदारमोहितेंनी पुन्हा बाजी मारत आपल्या श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनेलने १८ पैकी १० सदस्य निवडून आणले. २०१४ नंतर मोहितेंचे सारे विरोधक या निवडणुकीत एकत्र आले होते. तरीही श्रीभीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेल या त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला होता. नंतर २४ मे रोजी मोहितेंचेच सभापती, उपसभापती निवडून आले.
प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून दरवर्षी सभापती,उपसभापतींनी राजीनामा द्यायचे ठरले. त्यानुसार सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी तो दिला. दरम्यान, वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राष्ट्रवादीत फूट पडली.शरद पवार राष्ट्रवादी(NCP) समर्थक बाजार समितीच्या दोन, तर ठाकरे समर्थक एक अशा तिघा संचालकांनी मोहितेंची साथ सोडली.ते विरोधी गटाला जाऊन मिळाले.त्यामुळे त्यांच्याकडे ११-७ असे बहूमत झाले आहे.त्यामुळे सभापती,उपसभापती निवडणुकीत पराभव होईल,या शक्यतेने आ. मोहितेंनी तिला स्थगिती आणली.मात्र,विरोधक उच्च न्यायालयात गेल्याने ती उठली.त्यामुळे उद्या ही निवडणूक होत आहे.
उद्या निवडणुकीत,जर विरोधकांचा सभापती,उपसभापती झाला, तर विधानसभेच्या तोंडावर मोहितेंना तो मोठा धक्का असणार आहे.त्यातून त्यांच्या विरोधकांना मोठे बळ मिळेल.त्यांची ही एकी विधानसभेला कायम राहिली, तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यावेळी झाडून सारे विरोधक एक झाल्याने मोहितेंचा पराभव झाला होता. गेल्यावर्षीच्या बाजार समिती निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याची आयती संधी उद्या मोहिते विरोधकांना आय़ती चालून आलेली आहे. तसेच त्यांना जिल्हा बॅंक,जिल्हा परिषद, तालुका पंचायतीतील मोहितेंच्या गडाला सुरुंग लावायला दारुगोळाही उद्याच्या यशातून मिळणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.