Ambegaon Political News : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व रजकीय पक्षांतील नेत्यांसह आमदारांनी आपापल्या मतदारसंघात शड्डू ठोकला आहे. विविध माध्यमांतून ते आपल्या मतदारांना साद घालताना दिसत आहेत.
अजित पवार गटाचे आंबेगाव विधानसभा मतदासंघातील आमदार दिलीप वळसे पाटील यांनी डिंभे धरणाच्या पाण्याचा मुद्दा पुढे करून शरद पवार गटावर डाव टाकला आहे. त्यामुळे आंबेगावातील विधानसभा निवडणुकीचा माहोलच तयार झाल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांचे निकटवर्तीय समजे जाणारे मंत्री दिलीप वळसे पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात सहभागी झाले. त्यानंतर शरद पवारांनी सोडून गेलेल्या आमदारांना धडा शिकवण्याची रणनीती आखली. त्याची चुणूक लोकसभा निवडणुकीत राज्याने पाहिली. आता विधानसभेसाठी पवारांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्यातल्या त्यात त्यांनी पुणे जिल्ह्यावर विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर पुणे जिल्ह्याचा दौरा केला. जुन्नरमध्ये असलेल्या पवारांनी आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आता वळसे पाटील यांनी डिभे धरणाचा फोटो ट्विट करून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना आव्हान केले आहे.
डिंभे धरणातील पाणी बंद पाईपलाईनने नगरमधील जामखेड-कर्जतला नेण्याची योजना आहे. त्याला आंबेगावातील लोकप्रतिनीधीसह लोकांचा विरोध आहे. त्यातच जुन्नरमध्ये पवार यांनीही आंबेगावातील लोकांची तहान भागवून पाणी दुसऱ्या तालुक्यांना दिले तर त्यात वावगे काय, असे मत व्यक्त केले. त्यानंतर आता वळसे पाटील Dilip Walse Patil यांनी हा काळ संघर्षाचा असून त्याविरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वळसे पाटील यांनी ट्विटमध्ये, काळ जरी संघर्षाचा असला तरी माझ्या आंबेगाव-शिरूरच्या जनतेसाठी मी अशी अनेक आव्हाने पेलण्यासाठी समर्थ आहे. आंबेगाव-शिरूरची जनता हीच माझी ताकद असल्याचे स्पष्ट करत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार असल्याचे सूचक इशारा दिला आहे. वळसे पाटील आणि रोहित पवार यांच्या भूमिकेने डिंभे धरणाचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.