Walse Patil's Challenge to : ‘त्यांनी एकदा नशीब आजमावून पाहावे...’ ; वळसे पाटलांनी कुणाला दिले चॅलेंज?

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख विद्वान असा करत त्यांनी केलेल्या आरोपांना वळसे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले.
Dilip Walse-Patil
Dilip Walse-Patil Sarkarnama

Ambegaon Politic's : सध्या निष्ठेबद्दल काही जण बोलत आहे, त्यांना आम्ही काहीच कमी पडू दिलेले नाही. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे दहा वर्षे अध्यक्ष, सात वर्षे बाजार समितीचे सभापती, एकदा लोकसभेची उमेदवारी दिली. सत्तेची पदे घेऊनही त्यांनी गावागावांत दुफळी, गट-तट निर्माण करण्याचे काम केले. त्यांना अनेकदा समजावून सांगितले. पण, फरक पडला नाही. आता वेगळी भूमिका घेतली. त्याबद्दलही मला काही बोलायचे नाही. त्यांनी स्वतःचे नशीब आजमावून पाहायला हरकत नाही, अशा शब्दांत नाव न घेता दिलीप वळसे पाटील यांनी माजी सभापती देवदत्त निकम यांना विधानसभा लढविण्याचे खुले आव्हान दिले. (Dilip Walse Patil's challenge to Devdatta Nikam to contest elections)

दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी अजित पवारांना साथ दिल्यामुळे देवदत्त निकम (Devdatta Nikam) यांनी आपण निष्ठावंत असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर असल्याचे जाहीर केले होते. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथे झालेल्या मेळाव्याला निकम काही कार्यकर्त्यांना घेऊन गेले होते. याबाबत सध्या सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Dilip Walse-Patil
Walse Patil Offer to Rohit Pawar : मी आमदारकी सोडतो, तुम्ही आंबेगावमधून उभे राहा; वळसे पाटलांनी दिली होती रोहित पवारांना ऑफर

वळसे पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मंचरला सभा झाल्यास सर्व कार्यकर्त्यांनी सभेला जावे. कारण, त्यांचे आंबेगाव-शिरूरच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. हे माझ्यासह येथील जनतेला मान्य आहे.

Dilip Walse-Patil
Walse Patil News : मला ईडी, सीबीआयची नोटीस नाही, पण ‘या' कारणांमुळे अजितदादांसोबत गेलो; वळसे पाटलांनी भूमिका केली स्पष्ट

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या आरोपांनाही दिलीप वळसे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, एका विद्वानाने आरोप केला की, वळसे पाटील यांनी ठाकरे सरकार अस्तित्वात असताना शिवसेनेचे आमदार सूरतला जात असल्याची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली नाही. वळसे पाटील हे ईडीला घाबरले. शिवसेनेतील आमदारांमध्ये हालचाली सुरु आहेत. याबाबत काळजी घ्यावी. असे मी आणि अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सहा महिने आधीचे सांगितले होते. ठाकरे यांनी काळजी घेतली असती, तर महाविकास आघाडीचे सरकार पडले नसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com