Deenanath Hospital : भिसे कुटुंबियांकडे 10 लाख मागणाऱ्या डॉक्टरांचा राजीनामा; 2 कारणांच्या आधारे घेतला मोठा निर्णय

Deenanath Hospital News : पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी प्राथमिक अहवालात दोषी आढळल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. सुश्रृत घैसास यांनी राजीनामा दिला आहे.
Deenanath Mangeshkar Hospital
Deenanath Mangeshkar HospitalSarkarnama
Published on
Updated on

Deenanath Hospital News : पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी प्राथमिक अहवालात दोषी आढळल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. सुश्रृत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. रुग्णालयाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय पाहता राजीनामा देत असल्याचे घैसास यांनी सांगितले.

भिसे कुटुंबियांकडे 10 लाख रुपयांच्या अनामत रक्कमेची मागणी केल्याप्रकरणी आणि पाच तास उपचारासाठी थांबवून ठेवल्याचा ठपका घैसास यांच्यावर चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासन आणि डॉ. घैसास यांच्यावर चुहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती. हॉस्पिटलची हीच बदनामी थांबविण्यासाठी घैसास यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

Deenanath Mangeshkar Hospital
Deenanath Mangeshkar Hospital Tax : 48 तासांत मंगेशकर रुग्णालयाचे 27 कोटी वसूल करा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'नाहीतर मी आंदोलनाला बसेल'

राज्य सरकारच्या चौकशी अहवालात काय?

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने डॉ. राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने आज आपला अहवाल सादर केला. यात भिसेंच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सकाळी नऊ वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या तनिषाला रक्तस्त्राव होत असताना देखील तब्बल पाच तास थांबवून घेतले पण उपचार केला नाही. तसेच रुग्णालयाकडून डिपाॅझिट म्हणून 10 लाखांची मागणी केली असल्याचे देखील अहवालातून उघड झाले आहे.

Deenanath Mangeshkar Hospital
Deenanath Hospital Case : मोठी बातमी! तनिषाच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार, 10 लाख मागितले अन् पाच तास थांबवले

याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, अहवालामध्ये रुग्ण सकाळी 9 वाजून 1 मिनिटाने रुग्णालयात दाखल झाला. तिच्या ऑपरेशनची देखील तयारीही करण्यात आली होती. मात्र, रुग्णाला 10 लाखांचे डिपाॅझिट भरण्यास सांगितले. रुग्णाच्या नातेवाईकाईंनी काही रक्कम भरण्याची तयारी दाखवली होती. मात्र, रुग्णावर उपचार करण्यात आले नाहीत. रुग्णाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना रुग्णालयाकडून कुठलेही उपचार करण्यात आले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com