Dinanath Mangeshkar Hospital : पुणे महापालिकाचा कोट्यवधींचा 'टॅक्स' थकवल्याच्या आरोपावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दिलं उत्तर, म्हटले...

Dinanath Mangeshkar hospital tax controversy: ''...त्यामुळे त्यात काहीच वाद नाही.'' असंही दीनानाथ मंगेशकर रूग्णलयाने पत्रकारपरिषदेतून स्पष्ट केले आहे.
Dinanath Mangeshkar Hospital and  Pune Municipal Corporation
Dinanath Mangeshkar Hospital and Pune Municipal Corporationsarkarnama
Published on
Updated on

Dinanath Mangeshkar Hospital and Pune Municipal Corporation Tax :पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर मागील काही दिवासांपासून वादात साडपलं आहे. या महिलेच्या मृत्यूस हे रूग्णालय कारणीभूत ठरल्याचा आरोप केला जात आहे. यावरून प्रचंड वादंग निर्माण झालं असून, राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. तर राज्य शासनानेही याबाबत गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, या रूग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल २७ कोटींचा टॅक्स थकवला असल्याचंही बोललं जात आहे, प्रसारमाध्यमांवर तशा बातम्याही येत आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दीनानाथ मंगेशकर रूग्णलयाचे डीन डॉ.केळकर यांनी पत्रकारपरिषद घेत रूग्णालयाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी रूग्णालय प्रशासनाने कोट्यवधींचा टॅक्स थकवला असल्याच्या आरोपावरही उत्तर दिले.

Dinanath Mangeshkar Hospital and  Pune Municipal Corporation
Deenanath Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डॉ. घैसास यांच्या राजीनाम्यानंतर घेतली महत्त्वपूर्ण पत्रकापरिषद अन् सांगितले...

डॉ.केळकर म्हणाले, ''रुग्णालयाचा महापालिकेचा जो कर आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. महापालिकेचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही सगळे पैसे भरतो ते कोर्टातच भरतो. आता जे आम्ही कराचे पैसे भरतो ते कोर्टात भरतो. त्यात आमचा एकही रुपयाचा कर थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, नाहीतर बंद करतील.''

तसेच ''त्यांची जी कर आकारणीची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शिल केली आणि त्याला आम्ही कोर्टात आव्हान दिलं. कोर्टाने जो निर्णय दिला आहे, तो दिन्ही पक्षांना पाळणं बंधनकारक आहे. त्यांनाही आणि मलाही बंधनकाकर आहे. त्यामुळे त्यात काहीच वाद नाही.'' असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Dinanath Mangeshkar Hospital and  Pune Municipal Corporation
Deenanath Hospital : सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत गर्भवतीला उपचाराशिवाय थांबवलं : दीनानाथमध्ये 'साडे पाच' तास काय घडलं?

यावर मीडियाप्रतिनिधीन प्रश्न केला की, म्हणजे टॅक्ससाठी पळवाट काढली का? ''नाही, पैसा भरावाच लागणार. जर कोर्टाने त्यांच्या बाजूनं निकाल दिला तर एकही पैसा सोडता येणार नाही.'' असं केळकर म्हणाले. तर मग सगळेच चॅरिटेबल ट्रस्ट तुमच्यासारखंच करतील? असा प्रश्न केला असता, - ''मला, समजलं नाही. पण कोर्टात जाण्याचा जगात प्रत्येकालाच अधिकार आहे. लोकशाहीचा न्यायव्यवस्था एक स्तंभ आहे. टॅक्समध्ये आम्ही कुठलीही सवलत घेतलली नाही. कोर्टात आहे, आम्हाला काहीही सवलत नाही.''

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com