पिंपरीत फडणवीसांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फेकल्या चपला आणि बांगड्या

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत असल्याने वातावरण तणावपूर्ण झाल्याने येथील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
BJP & NCP
BJP & NCPSarkarnama

पिंपरी : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज (ता.6 मार्च) पिंपरी-चिंचवड (Pimpri -Chinchwad) येथील विकासकामांचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते आमने सामने आले आणि गोंधळ निर्माण झाला आहे. यावेळी फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चपला आणि बांगड्या फेकण्याची घटना घडली आहे. एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असल्याने पोलिसांनी (Pimpri-Police) परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आंदोलकांवर लाठचार्ज केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत असून येथील वातावरण तणावपूर्ण झाल्याने येथील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

BJP & NCP
बारामतीत राष्ट्रवादीची 17 मते फुटली : सतिश काकडेंचा गौप्यस्फोट

पिंपरी-चिंचवड मधील विविध विकासकामांचे उद्घाटन आज (ता.6 मार्च) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये अटल बिहारी वाचपेयी उद्यानाचेही उद्घाटन होणार आहे. या उद्यानाचे काम अर्धवट करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली य़ास प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. यामुळे येथील परिस्थिती चिघळली आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली असून येथील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला आहे. परिस्थिती हाताबाहेर जावू नये याकरिता पोलिसांचा येथील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

BJP & NCP
नरेंद्र मोदींनी असा नोंदवला पुणे मेट्रोबद्दल आपला अभिप्राय

दरम्यान आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो आणि पुणे महापालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे उदघाटन पुण्यात : काँग्रेसचे आंदोलन मात्र, पिंपरीत

32 पैकी फक्त 12 किलोमीटरच्या अर्धवट मेट्रोमार्गाचे पालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात उदघाटन करीत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक दिवस अगोदर खोचक टीका केली होती. याच मुद्यावरून कॉंग्रेसनेही मोदींचा आज मेट्रोच्या उदघाटनानंतर निषेध केला. कडक बंदोबस्त व परवानगी अभावी कॉंग्रेसने पुण्याऐवजी पिंपरी मेट्रो स्थानकात निषेध आंदोलन केले.

महाराष्ट्रामुळे कोरोना देशभर पसरला हे मोदींचे संसदेतील अवमानकारक विधान आणि त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवरायांविषयींच्या आक्षेपार्ह वक्तव्याची किनार आजच्या कॉंग्रेस आंदोलनाला होती. मेट्रोचे काम अर्धवट असताना निव्वळ निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन भाजपने श्रेय लाटण्यासाठी उद्‌घाटनाची घाई केली. त्यामुळे त्यांचा निषेध करीत असल्याचे पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.

काळे झेंडे दाखवून त्यांनी व इतरांनी निषेध व्यक्त केला. पुणे-पिंपरी मेट्रो हे कॉंग्रेसचे नियोजन आहे. असा दावा करीत निव्वळ श्रेय लाटून, प्रसिध्दी मिळविण्यासाठी आणि काम अर्धवट असतानाही पंतप्रधानांच्या हस्ते भाजप त्याचे उद्‌घाटन करीत आहे, असे डॉ. कदम म्हणाले. पुणे, पिंपरीमध्ये मेट्रो सेवा सुरु करण्याचे स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांचे नियोजन होते. पुढे त्याला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी चालना दिली. पीएमआरडीए स्थापनेनंतरच्या पहिल्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री अजित पवार आणि कलमाडी यांनी या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा केला, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com