पिंपरीत दंगली घडविण्याचा डाव : एमआयएमचा विहिंपवर आरोप

टिपू सुलताना यांच्या नावाचा फलक त्वरित काढण्याची मागणी विहिंप आणि बजरंग दलाने भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
MIM
MIMsarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : मुंबईतील मालाड मालवणी येथील मैदान तथा क्रिडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून मुंबई पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर विरोधी पक्ष भाजपकडून (BJP) सध्या आगपाखड चालू आहे. त्यावरून या दोन्ही पक्षांत घमासान सुरु आहे. हा वाद आता पिंपरी-चिंचवडला (Pimpri-Chinchwad) पोचला आहे. पण, येथे तो एमआयएम आणि विहिंप आणि बजरंगदल असा आहे. त्याला निमित्त ठरला आहे शहराच्या मध्यवर्ती भागातील टिपू सुलतानाच्या नावाचा चौक. या चौकात लावलेला टिपू सुलताना यांच्या नावाचा फलक त्वरित काढण्याची मागणी विहिंप आणि बजरंग दलाने भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे केली आहे. तर, टिपू सुलतान हा कुशल राजा आणि उत्तम प्रशासक होता, असे सांगत एमआयएमने (MIM) या मागणीला विरोध केला आहे.

MIM
पिंपरीत पावणेदोनशे कोटीच्या कामात भाजपचा स्मार्ट भ्रष्टाचार!

मुंबईतील नामांतर प्रकरणावरून उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये एमआयएम आणि विहिंप आमनेसामने आले असले. तरी भाजप व शिवसेना, मात्र शहरात शांतच आहे. शहरात चिंचवड येथे जुन्या पुणे-मुंबई मार्गावर डी मार्टसमोर हजरत टिपू सुलतान चौक आहे. तसेच जवळच एक हजार लोकसंख्येची टिपू सुलताननगर नावाची झोपडपट्टीही आहे. तिची बाहेरून नुकतीच पालिका प्रशासनाने रंगरंगोटी केली. त्याला, मात्र भाजपने आक्षेप घेतला नाही. उलट त्यांच्याच एका स्थानिक नगरसेवकाने त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. गेल्या २५ वर्षापासून टिपू सुलताननगर झोपडपट्टी वा टिपू सुलतान चौकाला कुणाचा आक्षेप नव्हता.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मालवणी येथील मैदानाच्या नामकरणाचा वाद होताच पिंपरीतही तो सुरु झाला आहे. टिपू हा क्रूर शासक होता. त्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले. त्याला विरोध करणाऱ्यांची त्याने कत्तल केली. हजारो देवळे उध्वस्त केली. म्हणून अशा धर्मांधाचे नाव चौकाला देणे निषेधार्य असल्याचे विहिंप व बजरंग दलाने म्हटले आहे. म्हणून त्याच्या नावाचा फलक त्वरित टाकून त्याऐवजी एखाद्या आदर्श राजाचे नाव या चौकाला देण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे.

MIM
सोमय्यांच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवारांचा थेट राऊतांना फोन!

ही मागणी म्हणजे शहरात दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केला आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या या प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी त्यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिसांकडे शनिवारी (ता. २९) केली. टिपू यांनी १५६ हिंदू मंदिरांना जमिनी व सोने दान दिले. भारतात रॉकेटची निर्मिती केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रजांच्या विरोधात लढा दिला, भारतात सर्वात मोठे ग्रंथालय उभारले. याच इतिहासाची दखल घेऊन या देशाच्या संविधान निर्मात्यांनी भारतीय संविधानाच्या १६५ पानावर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत फोटो लावून शहिद टिपू सुलतान यांना सन्मान दिला आहे, असे एमआयएमने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com