Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत डिजिटल 'विघ्न'

Ganesh Visarjan : इंटरनेट जॅमरमुळेसुद्धा इंटरनेटचे स्पीड खालावण्याची शक्यता आहे.
Ganesh Visarjan Pune
Ganesh Visarjan PuneSarkarnama

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या एक दिवसाआधीपासूनच इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या सर्वच कंपन्यांची इंटरनेट गती मंदावलेली आहे. स्लो झालेल्या इंटरनेट स्पीडमुळे लोक वैतागलेले आहेत. विसर्जनाच्या दिवशी स्लो इंटरनेट स्पीडच्या समस्याने नेट वापरकर्ते आणि गणेशभक्त हैराण झाले आहेत.

गणेश विसर्जनच्या आदल्या दिवशीपासून गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीचे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात इंटरनेट- सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. मात्र ते अपलोड आणि शेअर करण्यात स्पीडची समस्या येत असल्याने गणेश भक्त प्रचंड वैतागलेले आहेत. अजूनही इंटरनेट स्पीड पूर्वरत होत नसल्याने, आता नेमकं ही समस्या कशी सोडवायची ? असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे.

Ganesh Visarjan Pune
फोटोसाठी लोकांच्या जवळ जावं लागतं, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना चिमटा

विसर्जन मिरवणुकीच्या ठिकाणी इंटरनेट स्पीडची समस्या अधिकच तीव्रतेने गणेशभक्तांना जाणवत आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचे सोशल मीडियावर फोटो अपलोड करणारे गणेशभक्त वैतागलेले आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या स्वाभाविकपणे वाढलेली असते. तर राज्यभरातून आणि एकूणच देशभरातून अनेक नागरिक खास विसर्जन मिरवणुकीच्या आकर्षणामुळे पुण्यात दाखल होत असतात. तसेच काही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मिरवणुकीत येत असल्याने, त्यांच्या ताफ्यात असलेल्या इंटरनेट जॅमरमुळे देखील इंटरनेटचे स्पीड खालावण्याची शक्यता आहे.

अनेक नोकरदार, परराज्यातील किंवा परदेशातील कंपन्यांसाठी काम करणाऱ्या कर्मचारी यांना आज सुट्टी नाही. त्यामुळे त्यांचे काम आजही सुरूच असते. या सर्वांना देखील इंटरनेटच्या कमी गतीची समस्या सहन करावी लागत आहे. खास करून ज्यांचे मोबाइल, इंटरनेटवर काम सुरू असतात, त्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

'काल रात्रीपासून माझ्या मोबाईलचे इंटरनेट स्लो चालत आहे. रात्री 12 नंतर स्पीड वाढले. मात्र आता मी जेव्हापासून मिरवणूकीत आहे तेव्हापासून स्पीड आणखी कमी झाल्याचे दिसते. फुल नेटवर्क असल्याचे मोबाईलमध्ये दिसत आहे. मात्र तरी देखील नेट नीट चालत नाही. व्हाट्सअपला स्टेटस टाकायला वीस ते पंचवीस मिनिट वेळ जात आहे, अशी खंत मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणीने सांगितली आहे.

Ganesh Visarjan Pune
गणेश विसर्जन मिरवणुकीत खा. बारणेंनी लुटला ढोलवादनाचा आनंद

स्पीड वाढवण्यासाठी या गोष्टी करा :

- मोबाईलमध्ये आधीच सुरू असलेल्या ऑटो अपडेटमुळे इंटरनेटची गती कमी होते. त्यामुळे डेटाची गती वाढविण्यासाठी ऑटो अपडेट्स बंद करा. यामुळे इंटरनेटचा वेग वाढेल.

-ठराविक वेळाने सतत कॅशे क्लियर करणे गरजेचे आहे. कॅशे क्लियर न केल्यास, फोन मंद होतो व इंटरनेटच्या वेग कमी होऊ शकतो.

- वेगवान इंटरनेट एक्सेस पॉईंट नेटवर्क अर्थात एपीएनच्या सेटिंगवर नक्कीच लक्ष द्या. ते बरोबर असलेच पाहिजे, अन्यथा डेटाची गती कमी होईल.

- फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यासारखे सोशल मीडिया अॅप्सदेखील इंटरनेटची गती कमी करतात. कारण ही अॅप्स जास्त डेटा वापरतात. त्यामुळे सेटिंग्जमध्ये जाऊन या अप्लिकेशनचे ऑटो प्ले व डाउनलोड पर्याय बंद करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com