गणेश विसर्जन मिरवणुकीत खा. बारणेंनी लुटला ढोलवादनाचा आनंद

MP Shring Barane| पुण्यातील नादब्रह्म ढोल ताशापथकात सहभागी होत खासदार श्रीरंग बारणेंनी वाजवला ढाेल
MP Shring Barane|
MP Shring Barane|

पिंपरी : ३१ ऑगस्टला आगमन झालेल्या बाप्पाचे आज विसर्जन झाले.पिंपरी-चिंचवडमधील भोसरी,मोशी,थेरगाव आदी काही भागात एक दिवस अगोदर विसर्जनाची प्रथा आहे.त्यानुसार मावळचे शिवसेना खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांनी थेरगावातील आपल्या सम्राट मित्र मंडळाच्या गणेशाचे विसर्जन काल केले. त्या मिरवणुकीत ते केवळ सहभागीच झाले नाही,तर कसलेल्या ढोलवादकाप्रमाणे त्यांनीही ढोलवादन केले. त्याला उपस्थिांनी मोठी दाद दिली.

सम्राट मित्र मंडळाचे खा. बारणे संस्थापक, त्यांचे पुतणे माजी नगरसेवक निलेश बारणे अध्यक्ष आणि मुलगा विश्वजीत बारणे कार्याध्यक्ष आहेत. मंडळाचे हे ४४ वे वर्षे आहे. कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा मोठ्या उत्साहात सम्राट गणेशाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी रात्री झाली. पुण्यातील नादब्रह्म ढोल ताशापथक होते. त्यांचे वादक मोठ्या जोशात ढोल वाजवत होते. ते पाहून खा. बारणे यांनाही ढोल वाजविण्याचा मोह झाला. मग त्यांनी कमरेला ढोल बांधलाच नाही, तर तो अतिशय लयबद्ध वाजविलाही. त्याचा मनसोक्त आनंद घेतला.रात्री उशिरापर्यंत ते ढोल पथकाला प्रोत्साहन देत होते.

MP Shring Barane|
Navneet Rana| तुमचा माज कमी करा; पोलिस पत्नीने खासदार नवनीत राणांना झापलं...

युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्यासह कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणूक यावेळी उपस्थित होते.यापूर्वी सुद्धा ढोल वाजवला असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीत तो लयबद्ध वाजवला,असे खा.. बारणे यांनी सरकारनामाला सांगितले.मिरवणुकीत उत्साहात सुरु असलेले ढोलवादन पाहून मलाही ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही,असे ते म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवें यांनीही विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. औरंगाबादमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरवात झाली आहे. यावेळी अनेक राजकीय नेत्यांची या मिरवणुकीत सहभाग आहे. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यावेळी तरुणींचा गराडा त्यांच्याभोवती पडला आहे. अनेकजण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जमलेल्या तरुणी 'आदित्य आदित्य' म्हणत जल्लोष करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com