नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली ; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष

सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांच्यावर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा आरोप आहे.
dr narendra dabholkar
dr narendra dabholkarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर (dr narendra dabholkar)यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी गोळ्या झाडून हत्या करणयात आली होती. याप्रकरणी दोन जणांना प्रत्यक्षदर्शी दोन साक्षीदाराने ओळखले आहे.

याप्रकरणी शनिवारी पुणे न्यायालयात साक्षीदारासमोर आरोपींची ओळख परेड झाली. पुण्यातील विशेष न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरु आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांच्यावर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा आरोप आहे.

औरंगाबादचा सचिन अंदुरे आणि दौलताबात भागातील शरद कळसकर शरद कळसकर या दोघांनीच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे या दोन साक्षीदारांनी काल न्यायालयात सांगितले. या दोघांना ओळखणारे दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी आहेत.

dr narendra dabholkar
शिवसेनेनं खरंच, करुन दाखवलं, ISISचा प्रस्ताव बाकी आहे ; राणेंकडून टीकेचे बाण

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सर्व पाच आरोपींवर पुणे येथील शिवाजीनगरमधील नावंदर कोर्टात आरोपपत्र निश्चित झाले आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीवेळी सर्व आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. फक्त संजीव पुनाळेकर सुनावणीवेळी हजर नव्हता. शनिवारी न्यायालयात आरोपींची निम्मी ओळख परेड झाली असून उर्वरित पुढील ओळख परेड 23 मार्च रोजी होणार आहे.

dr narendra dabholkar
शिवसेना-भाजपमध्ये शिमगा सुरु ; दानवेंच्या दाव्यानंतर राऊतांचा गैाप्यस्फोट, म्हणाले..

शरद कळसकर, सचिन अंदुरे यांनी पहाटे पुण्यातील ओंकारेश्‍वर पूल गाठल्यानंतर पायी जाणारे काही गृहस्थ त्यांना दिसले; परंतु त्यातील नेमके दाभोलकर कोणते, याचा अंदाज शरदला आला नव्हता. त्यामुळे तो काही वेळ बिचकला होता. त्याची चलबिचल सुरू असतानाच एकाने डॉ. दाभोलकर यांचे नाव उच्चारून नमस्कार घातला अन्‌ तेथेच त्यांचे "लक्ष्य' निश्‍चित झाले. यानंतर दोघांकडून डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, अशी तपास यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com