शिवसेनेनं खरंच, करुन दाखवलं, ISISचा प्रस्ताव बाकी आहे ; राणेंकडून टीकेचे बाण

नितेश राणे (Nitesh Rane)यांनी शिवसेनची खिल्ली उडवली आहे. राणे यांनी टि्वट करुन शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.
Nitesh Rane
Nitesh Ranesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एमआयएम (MIM)पक्षाने महाराष्ट्रात भाजपला (BJP)हरवण्यासाठी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. यावरुन मोठ्या चर्चा सुरु आहे. यावरुन भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. राणे यांनी टि्वट करुन शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.

अनेक पक्षांकडून आता या युतीच्या चर्चांवरून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. राजकीय वर्तुळामध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये शिवसेना एक आहे. याचवरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

नितेश राणे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी..कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे..आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे..खरंच, करून दाखवलं,'' शिवसेनेचे मात्र ही आँफर धुडकावली आहे.

Nitesh Rane
शिवसेना-भाजपमध्ये शिमगा सुरु ; दानवेंच्या दाव्यानंतर राऊतांचा गैाप्यस्फोट, म्हणाले..

''भाजपा आणि एमआयएमची छुपी युती असल्याचे म्हणत औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणारे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही,'' अशा शब्दात शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊतांनी एमआयएमची ही आँफर धुडकावली आहे. ते म्हणाले, ''महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आणि तीनच पक्षांचे राहिलं. यात चौथा, पाचवा याला काही अर्थ नाही,''

Nitesh Rane
'मुंबई क्रिकेट'ची पोलिसांना 'गुगली' ; १४ कोटी थकविले ; ३५ पत्रांना केराची टोपली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ''एमआयएमने जरूर महाविकास आघाडी सोबत जावं. भाजपाविरुद्ध लढण्यासाठी, भाजपाला हरवण्यासाठी हे सगळं चालू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे आहे. आम्ही केलेली कामे आणि करत असलेली कामं जनता पाहत आहे,"

''कोणीही एकत्र आले तरी आता भाजपाला हरवू शकत नाही,'' असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ''शिवसेनेने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विसरून जनाब बाळासाहेब ठाकरे यांना स्वीकारले आहे,'' असा टोला फडणवीसांनी लगावला. ''या सर्व प्रकरणात शिवसेनेची भूमिका काय असणार आहे याकडे विशेष लक्ष असेल,'' असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com