Pradeep Kurulkar News: 'डीआरडीओ'चे संचालक डॉ.कुरुलकरांचा मुक्काम आता येरवडा कारागृहात

Pradeep Kurulkar News: कुरुलकरांच्या चौकशीत धक्कादाय माहिती समोर...
Pradeep Kurulkar News
Pradeep Kurulkar NewsSarkarnama
Published on
Updated on

DRDO director Pradeep Kurulkar : पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले 'डीआरडीओ'चे संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर यांना 29 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी (ता.16) दिले. त्यानंतर डॉ.कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यामुळे कुरुलकरांचा मुक्काम आता येरवडा कारागृहात असणार आहे.

देशाच्या संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पुरविल्याच्या संशयावरून डॉ.कुरुलकर यांना एटीएसने 4 मे रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे त्यांना एटीएसने शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Pradeep Kurulkar News
Pradeep Kurulkar News: कुरूलकरांची कोठडी वाढली; 'एटीएस'च्या हाती लागला चौथा मोबाईल, आणखी रहस्य उलगडणार

यावेळी सरकारी पक्षाकडून तपास अहवाल सादर करण्यात आला. डॉ.कुरुलकर यांच्या वकिलाने पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याची विनंती न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने कुरुलकरांना 29 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

डॉ.कुरुलकर यांना कारागृहातील विशेष कक्षात ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच कुरुलकरांना मधुमेह असल्याने त्यांना कारागृहात औषध उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले. पण घरचे जेवण देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.

Pradeep Kurulkar News
Pradeep Kurulkar Case Update : कुरुलकरांनंतर आता वायुदलाचा अधिकारीही 'हनीट्रॅप'चा शिकार; 'एटीएस'चा धक्कादायक खुलासा

दरम्यान, डॉ.कुरुलकर यांच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलचा न्यायवैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्या मोबाईलमधील संवेदनशील माहितीचे स्क्रिनशॉट काढण्यात आले आहेत. ‘एटीएस’चे अधिकारी कुरुलकर यांची कारागृहातही चौकशी करू शकतात. तसेच, गरज भासल्यास पॉलिग्राफ चाचणी करण्यात येईल, असे ‘एटीएस’ने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com