Congress on PM Narendra Modi : ड्रग्जमुक्त देशाची 'गारंटी' पंतप्रधान मोदी देणार का? वाढत्या ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसकडून मोदी लक्ष्य

Drugs Racket in Pune : पुण्यात 4 हजार कोटींचे ड्रग्ज सापडल्यावरून काँग्रेस आक्रमक
Narendra Modi, Gopal Tiwari
Narendra Modi, Gopal TiwariSarkarnama

Pune Political News :

महाराष्ट्रात सहा महिन्यांत हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्जच्या फॅक्टरी आढळल्या आहेत. आता तर पुण्यात तब्बल 4 हजार कोटींचे ड्रग्ज सापडले आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वारंवार 'गारंटी'...'गारंटी' म्हणत आहेत, तर ड्रग्जमुक्त भारताची 'गारंटी' मोदी का देत नाहीत? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

पुणे पोलिस आयुक्त आणि त्यांची टीम रोज विविध ठिकाणांहून ड्रग्ज हस्तगत करत आहेत. मोदी सरकार देशात 10 वर्षे सत्तेत असूनही एवढे ड्रग्ज (Drugs seized in Pune) देशात आले कुठून? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे. एवढेच नाही तर सत्तेतील भाजपला याचीही जबाबदारी स्वीकारावी लागेल. या गंभीर प्रश्नापासून सरकारला पळ काढता येणार नाही, असा आग्रही त्यांनी केला.

Narendra Modi, Gopal Tiwari
Pune Drug Racket : पुणे ड्रग्ज रॅकेटचे पंजाब कनेक्शन; मास्टर माइंड कुटुंबासह इंग्लंडमध्ये

काही महिन्यांपूर्वी सातत्याने गुजरातमधील अदानींच्या मुंद्रा पोर्टवर पकडण्यात आलेले कोट्यवधींचे ड्रग्ज नष्ट केल्याचे दाखवले आणि संदर्भदेखील गृह विभागाने जाहीर करावेत, अशी मागणी काँग्रेसने (Congress) केली.

70 वर्षांतील सर्वाधिक गुन्हेगारीचा दर देशात आणि राज्यात वाढला असून, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील तरुण पिढीस नशेच्या खाईत ढकलण्याचे पापकर्म केले जात आहे, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे.

देशाच्या सीमा ओलांडून येत असलेले अमली पदार्थ केंद्रीय गृह विभागाला दिसत नाही काय? असा सवाल करत काँग्रेसने गृहमंत्री अमित शाहांना धारेवर धरले आहे. त्याचवेळी ड्रग्जला मोदी सरकार रोखू शकत नसल्याचे सिद्ध झाल्याचाही दावा केला आहे.

त्यामुळे ड्रग्ज पकडण्यास राज्यातील आणि पुणे शहरातील पोलिसांवर ताण पडत आहे. पोलिसांना इतर सुरक्षेकडे लक्ष देण्यास मर्यादा येत आहेत, ही देशाच्या गृहखात्यास लाजिरवाणी बाब असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे शहराची (Pune City) ख्याती सुसंस्कृत शहर अशी आहे. सरकारला पुणे शहरासह महाराष्ट्राला ड्रगमाफियांचे केंद्र करावयाचे आहे काय, असा सवाल काँग्रेसचे गोपाळ तिवारी यांनी केला आहे. त्याचवेळी ससून हॉस्पिटलमधून अमली पदार्थाचे रॅकेट चालवणाऱ्या डॉ. संजीव ठाकूरला अद्याप अटक का केली जात नाही? ललित पाटीलवर आरोप पत्र दाखल का केले जात नाही? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

मोठ्या शहरांत रात्री उशिरापर्यंत हुक्का पार्लर, पबची संख्या वाढत असून, दहशतवादी कृत्ये आणि महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Narendra Modi, Gopal Tiwari
Drug Racket News : महाभयानक ड्रग रॅकेटला कोण देतंय राजाश्रय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com