Drug Racket News : महाभयानक ड्रग रॅकेटला कोण देतंय राजाश्रय?

Pune Police seized drug : पुणे पोलिसांनी केला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त
Drug Racket Pune
Drug Racket PuneSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज रॅकेट आणि ड्रग्जमाफियांचा राजकीय संबंध यावरून पुण्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता पुणे पोलिसांना आतापर्यंतचे सर्वात मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. पुणे पोलिसांनी तब्बल अकराशे कोटी रुपयांचे 600 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. आता यामध्येही काही राजकीय धागेदोरे सापडणार का, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी काल दोन गोडाऊनची तपासणी करून 55 किलो ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर मंगळवारी कुरकुंभमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये छापा टाकत पोलिसांनी तब्बत 550 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. याबाबत तपास सुरू असून, आणखीदेखील ड्रग्ज सापडू शकतात, अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Drug Racket Pune
Assembly special session 2024 LIVE Updates: मराठा आरक्षण टिकेल का? जरांगेंना शंका

आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत

आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ज्या कंपनीच्या आवारातून हा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आलेला आहे. ती कंपनी साबळे या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर आहे. तसेच या प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता आहे. भारतीय वंशाचे मात्र परदेशात राहत असलेल्या व्यक्तींचा यामध्ये हात असण्याची शक्यता असल्याचं अमितेश कुमार म्हणाले.

कुठे होता हा कारखाना ?

पुणे शहराजवळ असणाऱ्या कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये हे रॅकेट सुरू होते. कुरकुंभ येथील एका केमिकल कारखान्यात ड्रग्जची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वेगाने हालचाली करत पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थ केम लॅबोरेटरीज कंपनीवर छापा टाकला. त्यामध्ये पोलिसांना अपेक्षेपेक्षा अधिक ड्रग्जचा साठा सापडला असून, या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Drug Racket Pune
Raj's Reaction on Maratha reservation मराठा आरक्षणाच्या मंजुरीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; ‘हा आनंद मानण्यासारखा निर्णय नाही’

राजकीय कनेक्शनचा संशय

पुण्यामध्ये ललित पाटील या ड्रग्ज प्रकरणांमध्ये राजकीय संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या रॅकेटमध्ये काही राजकीय धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत का? यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, या प्रकरणात सोमवारी तीन जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख यांचा समावेश आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. आरोपी वर्षभर येरवडा जेलमध्ये बंद होते. मात्र, बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा हा व्यवसाय सुरू केला असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांकडून प्राथमिक तपास करण्यात आला असून, सखोल तपास सुरू आहे. मात्र, अध्याप तरी यामध्ये कोणतीही राजकीय 'इन्व्हॉलमेंट' अद्याप आढळून आलेली नसल्याचं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

Edited By : Chaitanya Machale

R

Drug Racket Pune
MLA Rohit Pawar : 'वादा तोच..! पण दादा नवा...!'; रोहित पवारांच्या बॅनर्सची चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com