Pune ZP : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत ‘घराणेशाही’, मंत्र्यांचे पुत्र, आमदारांच्या पत्नी-पुतणे मैदानात, समोर आली 35 जणांची लिस्ट

Dynasty Politics Pune ZP : माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी, दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचरणे यादेखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
Pune ZP
Pune ZP Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धामधूम राज्यभरामध्ये सुरू आहे. तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये आजी-माजी सदस्य आणि त्यांच्या कुटुंबातील जवळपास 35 पेक्षा अधिक उमेदवार प्रमुख राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मंत्र्यांच्या मुलाबरोबरच माजी आमदारांच्या पत्नी, पुतणे निवडणुकीमध्ये उतरले असल्याचे पाहायला मिळत आहेत.

यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे हे पंचायत समितीसाठी इंदापुरातून उमेदवार आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी, दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचरणे यादेखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांना देखील जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे, माजी आमदार काशिनाथ खुटवड यांचे चिरंजीव विक्रम खुटवड झेडपीचे उमेदवार आहेत.

या मंत्र्यांच्या नातेवाईकांसह मावळत्या जिल्हा परिषदेतील सदस्य असलेले रणजीत शिवतारे, आशा बुचके, विवेक वळसे पाटील,गुलाब पारखे, बाबूराव वायकर, तुलसीभोर, सुजाता पवार, विठ्ठल आवळे, दत्ता झुरंगे, अंकिता पाटील, रेखा बांदल हे उमेदवार आहेत.

Pune ZP
Green Maharashtra controversy : इम्तियाज जलीलांचा ‘हिरवा महाराष्ट्र’ बॉम्ब; भाजप अंगावर जाण्याच्या मूडमध्ये!

याशिवाय माजी सदस्य असलेले श्रीमंत ढोले, अरुण गिरे, दत्ता गुंड, मानसिंग धुमाळ निवडणूक लढवत आहेत. याशिवाय देवराम लांडे, देविदास दरेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, गंगाराम जगदाळे, कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, आप्पासाहेब जगदाळे, देवबा जाधव, शेखर पाचुंदकर यांच्यासह अनेकांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.

पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक आणि माजी अध्यक्ष भगवान पासलकर हे सहकारातून जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहेत. आयपीएस अधिकारी अमोल झेंडे यांची पत्नीदेखील पुरंदरमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भरणेंचे पुत्र निवडणुकीच्या मैदानात

वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या त्या कन्या व माजी अध्यक्ष सदाअण्णा झेंडे यांच्या कुटुंबाशी त्या संबंधित आहेत.इंदापूरमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब जगदाळे यांच्या कुटुंबाने देखील राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेतली आहे.

Pune ZP
Jalgaon Mayor : जळगाव महापौर पदावरून नवा पेच, मराठा की लेवा पाटील? गिरीश महाजन घेणार निर्णय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com