ED Raid : लालूप्रसाद यादव यांच्यासह देशभरात १५ ठिकाणी ED ची छापेमारी ; लालुंच्या तीन मुलींच्या घरांवरही...

ED Raid at Lalu Prasad Yadav's Place: ईडीने दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशातील जवळपास १५ ठिकाणांवर छापे मारले.
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav Sarkarnama
Published on
Updated on

ED Raid In Delhi: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख, माजी केंद्रीय मंत्री आणि लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तियांवर ईडीने कारवाई केली आहे. आज (शुक्रवारी) सक्तवसुली संचालनालयाने (ED) जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी मोठी छापेमारी केली आहे.

दिवसेंदिवस लँड फॉर जॉबच्या प्रकरणात लालू यादव यांच्या अडचणी वाढतच आहेत. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांची दिल्लीत चौकशी केली होती.

याआधी सीबीआयने या प्रकरणात लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती.

ईडीने (ED) शुक्रवारी (10 मार्च) मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi)आणि पाटणा (Patna) येथे अनेक ठिकाणी या प्रकरणी कारवाई केली आहे.

लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या मुलींच्या घरांसह दिल्लीतील 15 ठिकाणी ईडीच्या पथकानं छापे टाकल्याची माहिती आहे. ईडीने दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशातील जवळपास १५ ठिकाणांवर छापे मारले.

Lalu Prasad Yadav
Sanjay Raut On Raj Thackeray: राज कधीपासून हिंदु्त्ववादी झालेत..; राऊतांचा टोमणा

लालू यादव यांच्या तीन मुलींच्या घरांवरही छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हेमा, रागिणी आणि चंदा यांचं घर दिल्लीत आहे, ज्यांच्या घरी ईडीकडून सध्या झाडाझडती सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचं पथक लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही पोहोचलं आहे.

राजदचे माजी आमदार के अबू दोजाना (Abu Dojana) यांच्या पाटणा येथील घरीही छापेमारी सुरु आहे. ईडीचे पथक या ठिकाणी कसून चौकशी करीत आहे. आमदार अबू दोजाना हे बांधकाम व्यावसायिक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com