फडणवीसांबाबत न बोलणचं बरं, तिखट प्रतिक्रिया येतात ; खडसेंचा सावध पवित्रा

शिक्रापूर येथे माध्यमांशी बोलताना खडसे यांनी या विषयावर बोलणं टाळलं.
Eknathrao Khadse, Amruta Fadnavis
Eknathrao Khadse, Amruta Fadnavissarkarnama
Published on
Updated on

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुंबई महापालिकेला वाहतुकीवरुन लक्ष्य केले आहे. ''मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होतात,'' असं विधान त्यांनी नुकतेच केलं. यामुळे वाद निर्माण झाला. भाजपचे नेते एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) यांनी अमृता फडणवीस यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिक्रापूर (पुणे) येथे माध्यमांशी बोलताना खडसे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. या विषयावर बोलणं टाळलं. खडसे म्हणाले, ''अमृता फडणवीस यांनी घटस्फोटाबाबत कुठून कसा शोध लावला कोणास ठाऊक, त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली तर त्यांच्या फार तिखट प्रतिक्रिया येतात त्यामुळे न बोलणचं बरं,''

दोन दिवसापूर्वी अमृता फडणवीस मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बाबत भाष्य केले. त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला होता. “तुम्ही हे विसरुन जा की मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आहे. जेव्हा मी काही बोलते तेव्हा मी सामान्य स्त्री म्हणून बोलते. मलाही रस्त्यांच्या खड्ड्यांचा किंवा इतर गोष्टींचा त्रास होतो. मी सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. आज मुंबईतील खड्ड्यांमुळे ट्राफिक जाम होतं आणि या ट्राफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात,'' असं त्या म्हणाल्या होत्या.

Eknathrao Khadse, Amruta Fadnavis
शिवसेनेचा हल्ला पूर्वनियोजित ; सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही फडणवीस यांच्या या विधानावर टीका केली आहे. ''मुंबईला बदनाम करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. मुंबईतील रस्ते गुळगुळीत आहेत, असा दावा आम्ही कधीही केला नाही. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतची माहिती मिळताच ते खड्डे बुजवले जात आहेत. वाहतूक कोंडीमुळे लोकांचे घटस्फोट होत आहेत, हे विधान चुकीचे आहे,'' अशा शब्दात त्यांनी फडणवीसांच्या टीकेली उत्तर दिले आहे.

पेडणेकर म्हणाल्या, ''मागील काही महिन्यांपासून 'ऐकावे ते नवल', अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यात येत आहेत. भाजपच्या संबंधित लोकांमुळे होत असलेल्या वक्तव्यामुळे लोकांचे मनोरंजन होते. मात्र, आता लोक सुद्धा त्यांच्या अशा वक्तव्याला कंटाळले आहेत,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com