Eknath Shinde In Baramati : बारामतीत आज शिंदे-फडणवीस-पवार; धनगर आंदोलकांची भेट घेणार ?

Dhangar Reservation And Devendra Fadnavis : ठोस आश्वासन आणि मुख्यमंत्री शिंदे आल्यानंतरच आंदोलन थांबवण्याची भूमिका
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : बारामती येथे धनगर समाजाने एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ९ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. धनगर कार्यकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातच एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे बारामतीत येत आहेत. बारामतीत आल्यानंतर आंदोलकांच्या मागणीनुसार ते धनगर उपोषकर्त्यांची भेट घेणार का, याकडे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी चौंडी येथे दोन महिन्यांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. यावर ५० दिवसांचा कालावधी देऊनही सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. सरकारच्या या वेळकाढूपणाचा निषेध करत धनगर समाजाच्या आंदोलनाची बारामती ठिणगी पडली आहे. या आंदोलनाची धग तीव्र करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बारामतीत बंद पुकारण्यात आला होता. त्याला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आंदोलनाचे लोन तालुकाभर पसरले. आता गावागावांतून या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Aditya Thackeray : मोठी बातमी ! आदित्य ठाकरेंना शिंदे सरकारने पोलिस स्टेशनमध्ये खेचले...

दरम्यान, नऊ वर्षांपूर्वी बारामतीतच भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ, असा शब्द दिला होता. मात्र, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार स्थापन होऊनही नऊ वर्षांत आरक्षणाबाबत कुठलीही भूमिका सरकारच्या वतीने घेण्यात आली नाही. सत्तेत येताच फडणवीसांना आपल्या शब्दाचा त्यांना विसर पडल्याचा आरोप होत आहेत. यूपीए आणि महायुती सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. आता समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून, आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.

सरकारच्या वेळ काढूनपणाचा निषेध करण्यासाठी आणि लवकरात लवकर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बारामती धनगर समाज एकवटला जात आहे. ठोस निर्णयाचा जीआर काढला जात नाही आणि उपोषण सोडवण्यास मुख्यमंत्री येत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार बारामतीत आहेत. ते आंदोलन स्थळाला भेट देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यांतील धनगर समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी जमावे, असे आवाहन वाघमोडे यांनी केले आहे.

आता मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी जालन्यात गेलेले मुख्यमंत्री शिंदे, धनगरांना आरक्षणाचा शब्द देणारे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खुद्द बारामतीचे आमदार उपमुख्यमंत्री पवार बारामतीत आल्यानंतर धनगर आंदोलकांची भेट घेणार का? याचीच चर्चा रंगली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Backward Classes Commission : राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात महत्त्वाची बैठक; संभाजीराजे घेणार भेट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com