Eknath Shinde News : अमित शाह, फडणवीसांवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रत्युत्तर!

Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पुण्यातून केलेल्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुण्यातूनच उत्तर दिलं आहे.
Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

पुण्यात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी 'अहमद शहा अब्दाली'चे राजकीय वंशज अमित शाह असल्याचं म्हटलं होतं. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतान त्यांना ढेकणाची उपमा दिली होती. पुण्यातून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात येऊनच उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आज(सोमवार) पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी पुण्यातील विविध प्रश्नांबाबत प्रशासनाची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरती ज्या पद्धतीने टीका करण्यात आली ती महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही. ज्या पद्धतीने ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. त्यातून हे स्पष्ट होत आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत आहे. त्यातूनच अशा प्रकारच्या टीका ते करत आहेत.'

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Election Commission : 79 जागांवरील भाजपच्या विजयाबाबत स्वयंसेवी संस्थांचा 'तो' दावा निवडणूक आयोगाने फेटाळला!

तसेच'आम्ही सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखील त्यांनी टीका केली आणि लाडका भाऊ ही योजना देखील आणा असं त्यांनी आव्हान दिलं होतं. त्यानंतर आम्ही लाडका भाऊ योजना देखील आणली आहे. शेतकऱ्यांसाठी देखील योजना सुरू आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे ते बेचैन झाले असून त्यातूनच या खालच्या पातळीवरच्या टीका करण्यात येत आहे.' असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

तसेच, 'ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. हे जनतेला कधी पटणार नाही. त्यामुळे जनताच त्यांना उत्तर देईल.' असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Supreme Court On Delhi Coaching Centers : 'खासगी शिकवणी वर्ग म्हणजे 'Death Chamber' बनले आहेत'; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले!

याशिवाय 'या पद्धतीने लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलणार. आरक्षण जाणार या पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आला. त्याच पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह विधानसभेला देखील पसरून आपण निवडणुका जिंकू असं त्यांना वाटत आहे. मात्र लोक एकदाच फसतात वारंवार अशा प्रकारच्या नॅरेटिव्हला लोकं बळी पडणार नाहीत. लोक घरी बसणाऱ्याला नाहीतर रस्त्यावरती उतरून काम करणाऱ्याला आगामी निवडणुकांमध्ये निवडून देतील.' असं एकनाथ शिंदे म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com