Dhangar Reservation : धनगर आरक्षण बैठकीबाबत चौंडीतील उपोषणकर्त्याचे मोठे विधान; ‘धनगर समाजाप्रती हे सरकार...’

Mumbai Meeting : धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.
Dhangar Reservation
Dhangar Reservation Sarkarnama

Mumbai News : धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत आज सह्याद्री अतिथिगृहावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. चौंडीमधील आंदोलकांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईत दाखल झाले आहे; पण त्यापूर्वीच उपोषणकर्त्यांनी सरकारवर अविश्वास दर्शविला आहे. ‘आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असं मला वाटत नाही. कारण धनगर समाजाप्रती असंवेदनशील असलेले हे सरकार आहे,’ असा आरोप चौंडीतील उपोषणकर्त्यांनी केला आहे. (Big statement by Hunger striker in Chaundi regarding the Dhangar reservation meeting)

Dhangar Reservation
Womens Reservation News : स्मृती इराणींचे योगदान काय? ठाकरे गटाचा प्रश्न; मोजक्या महिलांना खासदार-आमदार केल्याने...

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील चौंडी येथे उपोषण करणाऱ्यांनी सरकारवर अविश्वास दाखवला. धनगर आरक्षणाची बैठकीस मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आमदार राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत.

चौंडीतील उपोषणकर्त्यांनी सांगितले की, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असे मला वाटत नाही. धनगर समाजाप्रती असंवेदन असलेले हे सरकार आहे. या भाजप सरकारवर आमच्या अपेक्षा हेात्या. कारण भाजपला २०१४ मध्ये धनगर समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून दिले होते. संपूर्ण समाज त्यावेळी भाजपच्या पाठीशी राहिला होता.

Dhangar Reservation
MLA Disqualification Case Update : आमदार अपात्रता प्रकरणात मोठी घडामोड; विधानसभा अध्यक्ष दोन दिवसांत ठाकरे-शिंदे यांना नोटीस पाठविणार

बारामतीत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावू, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी नऊ वर्षे धनगर समाजाला आरक्षण दिलेले नाही. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होत असली तरी या सरकारकडून काही ठोस भूमिका आरक्षणाच्या प्रश्नावर घेतली जाईल, असे मला वाटत नाही. आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे. आरक्षणासंदर्भातील प्रमाणपत्रे आम्हाला द्यावीत. कारण आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारला अकरा दिवस लागले. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळेपर्यंत आमचे बेमुदत उपोषण सुरूच राहणार आहे, असेही उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.

Dhangar Reservation
Ajit Pawar-Padalkar News: धनगर आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; अजित पवार-पडळकर येणार एकत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com