हर्षवर्धन पाटील-दत्तात्रेय भरणे यांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागणार!

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर आपला गट मजूबत करण्याच्या दृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुकीत हे दोन्ही नेते लक्ष घालणार, हे मात्र निश्चित.
Harshvardhan Patil-Dattatray Bharane
Harshvardhan Patil-Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

वालचंदनगर (जि. पुणे) : माजी सहकार मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि माजी मंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागणार आहे. कारण, इंदापूर (Indapur) तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका (gram panchayat) जाहीर झाल्या आहेत. तालुक्याचे राजकारण या दोघांच्या भोवतीच फिरत असते, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर आपला गट मजूबत करण्याच्या दृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुकीत हे दोन्ही नेते लक्ष घालणार, हे मात्र निश्चित. (Elections for 26 gram panchayats in Indapur taluka announced)

इंदापूरच्या राजकारणाचे पडसाद राज्यात उमटत असतात. तालुक्यातील राजकारण सध्या राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री दत्तात्रेय भरणे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याभोवतीच फिरत आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे आमदार असून गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेल्या विकास कामामुळे राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जोमात आहेत. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकार जावून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्याने तालुक्याच्या राजकारणावरही त्याचा परिणाम झाला आहे.

Harshvardhan Patil-Dattatray Bharane
गांजाळे भाजपत जाणार होते; पण त्यांना प्रवेश मिळाला नाही : शिवसेना नेत्याचा आपल्याच सहकाऱ्यावर हल्लाबोल

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंदापूर तालुक्यासह बारामती लोकसभा मतदार संघामध्ये दौरा केल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणूका लांबल्या असून तत्पूर्वीच तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुराळा उडणार असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना महत्व आले.

Harshvardhan Patil-Dattatray Bharane
‘भीमा’च्या निवडणुकीबाबत परिचारकांनी फडणवीसांना ‘हा’ शब्द दिला होता : महाडिकांनी सांगितली इनसाईड स्टोरी

सध्या होणाऱ्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे आगामी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी आहे. हे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणूक जिंकण्यासाठी उत्सुक असून जोरदार तयारी सुरु आहे. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्यामुळे सरपंचपदासाठी चुरस निर्माण होणार आहे.

Harshvardhan Patil-Dattatray Bharane
गुवाहाटीत झालेल्या राजकीय स्फोटाची बत्ती आमदार राऊतांनी बार्शीतून पेटवली : कल्याणशेट्टींचा सत्तापालटाबाबत गौप्यस्फोट

निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती

पडस्थळ, अजोती सुगाव , झगडेवाडी , डाळज नंबर- १ ,डाळज नंबर- २ , डाळज नंबर- ३, जांब,मानकरवाडी, गंगावळण, थोरातवाडी, हिंगणगाव, सराटी, कळाशी,कुरवली, म्हसोबाचीवाडी, डिकसळ, माळवाडी, रणगाव(रणमोडवाडी), पिंपरी (खुर्द) शिरसोडी, न्हावी, रेडणी, मदनवाडी, लाखेवाडी, बोरी, बेलवाडी बिजवडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com