EVM Theft News : 'ईव्हीएम' चोरी प्रकरणातील अधिकाऱ्यांचे निलंबन अखेर रद्द !

EVM Control Unit Theft Issue : 'मॅट'चा राज्य सरकारला दणका; अधिकाऱ्यांना पुन्हा त्यांच्या जागी नियुक्त करण्याचे आदेश
EVM Control Unit
EVM Control Unit Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र (कंट्रोल युनिट) चोरीला गेल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचे स्पष्ट करत त्यांना पुन्हा त्याच जागी नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तहसीलदार विक्रम रजपूत, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, डीवायएसपी तानाजी बरडे असे दिलासा मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट) मध्ये धाव घेत घेतली होती. त्यांची बाजू ऐकूण घेत मॅटने राज्य सरकारला दणका देत या अधिकाऱ्यांना पुन्हा त्यांच्या जागी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात सासवड येथील तहसील कार्यालयात ठेवण्यात आलेल्या 'ईव्हीएम'मधील कन्ट्रोल युनिटची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमातून सर्वत्र झळकल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) राज्य सरकारला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. कामात हयगय केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या चोरीच्या घटनेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी (Collector) आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनीही तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या आदेशाविरोधात संबंधित अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यामध्ये या अधिकाऱ्यांनी बाजू मांडली. ज्या ठिकाणी ही ईव्हीएम ठेवण्यात आली होती. तेथे एक सुरक्षारक्षक आणि एक गृहरक्षक दलाचा कर्मचारी तैनात होते. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळोवेळी मतदान यंत्रे ठेवलेल्या गोदामाला भेट देऊन आढावा घेतला होता.

ईव्हीएममधील कंट्रोल युनिटची चोरी झाल्यानंतर पोलिसांनी (Police) तातडीने तपास करत चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मतदान यंत्रासह सर्व मुद्देमाल हस्तगतदेखील केला आहे. यामध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कोठेही दिसून येत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तो ग्राह्य धरून मॅटने या अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे हे तिन्ही अधिकारी पुन्हा आपल्या मूळ पदाचा पदभार घेऊ शकणार आहेत.

R

EVM Control Unit
Mohan Patil Arrest : अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाला अटक, आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com