Pune Politics : आता माजी नगरसेवकांना आमदार व्हायचंय! पुण्यात चुरस वाढणार; काय आहे कारण?

Vidhan Sabha Election : शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर इच्छुकांना अनेक पक्षांच्या पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांपुढे आपल्याच पक्षांतील माजी नगरसेवकांना शांत करण्याचे आव्हान असणार आहे.
Madhuri Misal, Prashant Hagtap, Sachin Dodke, Vasant More, Ravindra Dhangekar
Madhuri Misal, Prashant Hagtap, Sachin Dodke, Vasant More, Ravindra DhangekarSarkaranama

Pune Political News : राज्यातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सुमारे दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. लोकसभेपूर्वीच या निवडणुका होतील, असे बोलले जात होते. मात्र या निवडणुकीनंतर विधानसभेचीही चर्चा सुरू झाली. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, असा अंदाज आहे. यातूनच आता पुण्यातील अनेक माजी नगरसेवकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहे. परिणामी पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांमध्ये मोठी चुरस वाढणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला उशीर होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांच्या राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची भीती आहे. यातूनच आता सर्वच राजकीय पक्षांतील आजी-माजी नगरसेवकांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. काहींनी तर आपापल्या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्याने आमदारकीच्या इच्छुकांना राजकीय पक्षांचे पर्याय वाढलेले आहेत. परिणामी विधानसभा निवडणुकीत पक्षापक्षांतील उमेदवारांची तिकिट मिळवतानाच कसोटी लागणार आहे.

पर्वती

पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या नेत्या माधुरी मिसाळ आमदार आहेत. येथून भाजपचे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले आता तयारी करत आहेत. काँग्रेसकडून माजी नगरसेवक उल्हास बागुल यांनी इच्छा व्यक्त केलील आहे. त्यांना काँग्रेसने लोकसभेचे तिकिट नाकारले होते. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी कदम आणि राष्ट्रवादीचे सुभाष जगताप विधानसभेची तयारी करत आहेत.

Madhuri Misal, Prashant Hagtap, Sachin Dodke, Vasant More, Ravindra Dhangekar
Uddhav Thackeray & Sharad Pawar : 'त्यांच्या'साठी परतीची दारे उघडे आहेत का? ठाकरे, पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला

पुणे कॅन्टोन्मेंट

पुणे कॅन्टोन्मेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे हे पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे आणि त्यांचा मुलगा अविनाश हेही येथून दावा सांगण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर

शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे पुन्हा भाजपकडून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. तर काँग्रेसकडून माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी मैदान मारण्याची तयारी सुरू केलेली आहे.

कसबा

कसबा विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक हेमंत रासणे, धीरज घाटे आणि गणेश बिडकर हे भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह माजी नगरसेवक व शहर काँग्रेसचे प्रमुख अरविंद शिंदे यांनीही तयारी सुरू केलेली आहे.

Madhuri Misal, Prashant Hagtap, Sachin Dodke, Vasant More, Ravindra Dhangekar
Video Mahayuti News : थेट स्ट्राइक रेट सांगत शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा मोठा दावा; भाजप नव्हे तर महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ

कोथरूड

कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील करत आहेत. या विधानसभेत त्यांना मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांकडून मोठे आव्हान देण्याची शक्यता आहे.

खडकवासला

खडकवासला विधानसभेत भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. यांच्यासह आता भाजपकडून माजी नगरसेवक दिलीप वेडे-पाटील रेसमध्ये आहेत. तर राष्ट्रवादीचे विकास दांगट, सचिन दोडके आणि राष्ट्रवादीचे बाळू धनकवडे यांनीही तिकिट मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

वडगावशेरी

वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आमदार आहेत. आता त्यांना आरपीआय (ए)चे सिद्धार्थ धेंडे, शिवसेनेचे अजय भोसले, भाजपचे जगदीश मुळीक आणि बापू पठारे यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

हडपसर

हडपसरमधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार पुन्हा मैदानात असणार आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे नेते माजी नगरसेवक प्रशांत जगताप, योगेश ससाणे आणि वसंत मोरे यांचे तगडे आव्हान असणार आहे.

Madhuri Misal, Prashant Hagtap, Sachin Dodke, Vasant More, Ravindra Dhangekar
MNS On Shiv Sena Thackeray Party : मनसेचा शिवसेना ठाकरे पक्षावर 'हिरवा वार'; मतांसाठी 'कुबाड्या' घ्यावाच लागणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com