Pune Vikas Tingre News: पुण्यात काँग्रेस पदाधिकारी विकास टिंगरेंनी उचललं टोकाचं पाऊल; नेमकं घडलं तरी काय?

Pune Congress Leader Vikas Tingre News: विकास टिंगरे काल धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात आले होते.
Vikas Tingre
Vikas Tingre Sarkarnama

Vikas Tingre News: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहर काँग्रेसचे विश्रांतवाडी ब्लॉक अध्यक्ष विकास टिंगरे (Vikas Tingare) यांनी मंगळवारी (ता. २३) गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (Extreme step taken by Congress functionary Vikas Tingre in Pune)

Vikas Tingre
UPSC Results : गौरवास्पद! 'यूपीएससी'च्या निकालावर महाराष्ट्राची मोहोर ; 'एवढ्या' उमेदवारांनी मारली बाजी..

विकास टिंगरे मंगळवारी (२३ मे) धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात आले होते. बराच वेळ झाला होता. त्यांनी दुपारी जेवणही केलं नव्हतं. त्यामुळे कार्यालयातील काही कर्मचारी त्यांच्या केबिन मध्ये गेले असता त्यांना विकास टिंगरे यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखलं केलं. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Pune News)

विमानतळ पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. पण त्यांच्या आत्महत्या नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Congress)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com