Devendra Fadanvis News : आपला पन्नास टक्के महाराष्ट्र हा अवर्षणप्रवण आहे. याभागात पाऊस कमी पडतो. त्यामुळे जलसंधारणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. मागच्या काळात आपण जलयुक्त शिवाय योजना राबवली आणि वीस हजार गावांमध्ये आपण जलसंधारणाची कामं केली. यातून जवळपास ३७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्यामुळे रब्बीचा पेरा वाढला. शेतकऱ्यांना दोन पिकं घेता आली. आता पुन्हा आपण ही योजना सुरु करत आहोत. जलयुक्त शिवार टप्पा २ सुरु करत आहोत. यात पहिल्या टप्प्यात आपण पाच हजार गावं घेतली आहेत.
काही वेदर मॉडेल्समधून हे अल् निनोचं वर्ष असू शकतं, असं भाकित केलं आहेत. जर हे वर्ष अल् निनोचं असेल तर आपल्याला आतापासूनच जलसंधारण करावं लागेल. पाण्याचा थेंबन् थेंब साठवावा लागेल, त्यादृष्टीने हे महत्त्वाचे आहे. पानी फाऊंडेशन अतिशय चांगल्या प्रकारे हे करत आहे. जवळपास चाळीस हजार शेतकऱ्यांशी ते जोडले गेले आहेत. यासोबतच विषमुक्त शेती हादेखील एक महत्त्वाचा विषय पानी फाऊंडेशने हाती घेतला आहे.
पानी फाऊंडेशनच्या या कामात जर काही महत्त्वाचे असेल तर ज्याप्रकारे ते ट्रेनिंग देत आहेत, म्हणजे ट्रेनिंग घेणारा प्रत्येक शेतकरी केवळ ट्रेनिंग घेतोय असं नसून तो ट्रेनरही होत आहे. म्हणूनच मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना कायम पानी फाऊंडेशनला सोबत घेऊन काम केलं आहे. आताही त्यांच्यासाऱख्या ज्या चांगल्या संस्था असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. असही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांची मागणी असते की, आम्हाला दिवसा १२ तास वीज मिळावी. त्यासाठी आता आपल्याकडे जेवढे अॅग्रीकल्चरल फीडर आहेत ते सर्व सोलरवर आणण्याचा निर्णय़ आम्ही घेतला आहे. याच वर्षी तीस टक्के फिडर सोलरवर आणण्यासाठी काम हाती घेतल आहे. हे सर्व फिडर सोलरवर आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल. याचा पहिला प्रयोग आपण २०१७ साली राळेगणसिद्धीला केला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावी केला होता आणि तो यशस्वीही झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.