फडणवीस म्हणाले; पुण्यात भाजपाचेच अस्तित्व जाणवते

‘मॅन टू मॅन’ आणि ‘हार्ट टू हार्ट’ म्हणजेच मतदारांशी थेट संपर्क हे भाजपाचे पारंपरिक शक्तीस्थळ आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीससरकारनामा
Published on
Updated on

पुणे : पुण्यात लोकोपयोगी कामे होत असताना सत्ता आणि संघटन एकत्रित काम करीत आहेत, त्यामुळे शहरात जिथे जाईल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) शहर भाजपाच्यावतीने अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेली पुस्तिकेचे प्रकाशन, बोधचिन्ह आणि पक्षाच्या ‘यूट्यूब’ चॅनेलचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही : चंद्रकांतदादा

‘मॅन टू मॅन’ आणि ‘हार्ट टू हार्ट’ म्हणजेच मतदारांशी थेट संपर्क हे भाजपाचे पारंपरिक शक्तीस्थळ आहे. मतदारांपर्यंत केंद्र आणि महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि योजना पोहोचवा. त्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान महत्त्वाचे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ते मनावर घ्या. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर ते काहीही करू शकतात. पुण्यात चांगले काम केले आहे. लोकांमध्ये सकारात्मकतेची भावना आहे. मागच्या महापालिका निवडणुकीतील रेकॉर्ड तोडून आपण त्यापेक्षा जास्त जागा जिंकू शकतो. त्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना कार्यरत करण्यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करा.

देवेंद्र फडणवीस
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, ‘‘ पुणेकरांना नागरी सुविधा देऊन, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करा. भाजपाचे पुण्यात वर्चस्व आहे. लोकसंपर्क, लोकांचा विश्वास, जागरुकता, नियोजन, जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिकपणाची जोड यामुळे निवडणुकीत विजय खेचून आणण्याचे कौशल्य प्राप्त करता येते. राजकारणात केवळ आत्मविश्वास कामाचा नाही, तर सैन्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळेपर्यंत जागरुक राहायला पाहिजे.’’

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘ भाजपाचे ३३ हजारहून अधिक कार्यकर्ते २५ डिसेंबरला एकाच दिवसात पुणे शहरातील दीड लाखांहून अधिक घरांत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कार्य घराघरात पोहचविण्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविणार आहेत. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजना, महापालिकेची विकासकामे घरोघरी पोहोचविली जाणार आहेत या माध्यमातून संघटनचे सक्षमीकरण आणि जनसंपर्क वाढविण्यात येणार आहे.’’

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, सहा लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याची योजना करण्यात आली आहे. त्यासाठी मंडल बैठका, प्रभाग बैठका, शक्ती केंद्र बैठका, बूथ बैठका, बूथ समिती बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध योजनांची माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. तिचे दीड लाख कुटुंबांमध्ये वितरण करण्यात येणार आहे.

अभियानाचे प्रमुख राजेश पांडे म्हणाले, अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आठ मंडलातील ६० प्रभागप्रमुख, ६०० शक्तीकेंद्र प्रमुख, ३००० बूथप्रमुख आणि ३३ हजार बूथ संपर्क कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विविध योजना आणि विकासकामांबरोबर कॉल सेंटर, मतदार नोंदणी, यू ट्यूब चॅनेलची माहिती दिली जाणार आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com