Fake Facebook Account Of IAS : अबब! थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट; सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

Fake Facebook Account Of IAS Rajesh Deshmukh : पोलीस तक्रारीनंतरही हायटेक सायबर चोरट्यांचा धुमाकूळ..
Fake Facebook Account Of IAS Rajesh Deshmukh
Fake Facebook Account Of IAS Rajesh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सोशल मिडीयावर बनावट अकाउंट तयार करून फसणुकीचे प्रकार वाढल्याचे आपण पाहत आहोत. बड्या व्यक्तिंच्या नावे फेसबुवर किंवा अन्य सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर बड्या अधिकाऱ्यांचे फेक अकाऊंट बनवले जात आहेत. यातूनच सामान्य नागरिकांना या अकाऊंटच्या माध्यमातून मॅसेज करून पैशांची मागणी केली जाते. यातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. (Fake Facebook Account Fraud News)

Fake Facebook Account Of IAS Rajesh Deshmukh
US Peoples Protest against PM Modi: 'मोदी गो बॅक'..; अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदींच्या विरोधात नागरिकांकडून निषेध

पुण्यातील (Pune) नागरिकांना यासाठी लक्ष्य केले जात आहे. पुण्यात अशा प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अजून एक बनावट फेसबुक अकाउंट बनवण्यात आली आहे.

सायबर हायटेक चोरट्यांच्या लक्ष्यावर आता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आले आहेत. राजेश देशमुख यांच्या नावे बनावट अकाऊंट तयार करण्यात आले आहे. बनावट अकाउंट बनवून नागरिकांची मु्ख्यत: आर्थिक फसवणूक करण्याचा सायबर चोरट्यांचा डाव आहे.

काय आहे बनावट अकाऊंट ?

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचा फोटो वापरण्यात आलेला आहे. त्यांचा फोटो वापरत आयएएस असल्याची बतावणी करण्यात आले आहे. याआधीही देशमुख यांचे अशा प्रकारचे फेक अकाऊंट बनवण्यात आले होते. याबाबत पोलीसात यापूर्वीच तक्रार दाखल होऊनही जिल्हाधिकारी देशमुख यांचे असे बानावट अकाउंट बनवले जात आहे.

Fake Facebook Account Of IAS Rajesh Deshmukh
US Peoples Protest against PM Modi: 'मोदी गो बॅक'..; अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदींच्या विरोधात नागरिकांकडून निषेध

दोन महिन्यांत ५ वेळा फेक अकाउंट -

पोलिसांत तक्रार दाखल होऊनही फेक अकाऊंट बनवले जात आहेत. या अशा घटना पोलिसांचा धाक असूनही कमी झालेले दिसत नाही. असे बनावट अकाऊंट बनवणे सुरूच आहे. मागील केवळ दोनच महिन्याच्या कालवधीत तब्बल ५ ते ६ वेळा देशमुख यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार केले गेले आहे. या बनावट अकाऊंटद्वारे लोकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com