BRS News : 'बीआरएस'च्या धास्तीनेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळाले सहा हजार रुपये...; कुणी केला दावा ?

Telangana Pattern : ''लवकरच महाराष्ट्रात 'बीआरएस'चा मुख्यमंत्री...''
BRS News
BRS NewsSarkarnama

Pune : महाराष्ट्रापेक्षा आंध्रप्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होत होत्या. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्‍या नेतृत्वाखालील सरकारने दिलेल्या सेवा सुविधांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ९९ टक्के थांबल्या आहेत. यामुळे 'तेलंगणा पॅटर्न' देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशाला लागलेला कलंक आहे. त्यामुळे पुसण्यासाठी महाराष्ट्रासह देशात 'तेलंगणा पॅटर्न' राबविण्याची मागणी 'बीआरएस'कडून करण्यात येत आहे.

'बीआरएस'च्या किसान सेलचा महाराष्ट्र अध्यक्ष माणिक कदम आणि पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक बी.जे. देशमुख यांनी सोमवारी(दि.५) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची आत्महत्या रोखणाऱ्या 'तेलंगणा पॅटर्न'ची माहिती दिली. कदम म्हणाले, कृषीक्षेत्रासह शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही तेलंगणा सरकारने मोठे काम केले आहे. २०१४ पुर्वी महाराष्ट्रापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या आंध्रप्रदेशात होत होत्या. मात्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत पाणी आणि वीज मोफत उपलब्ध करून दिली.

BRS News
Ramtek Loksabha News : राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे पाय रोवणे सुरू, कॉंग्रेस अजूनही ढिम्मच...

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव(K.Chandrashekhar Rao) यांनी कृषीक्षेत्रासाठी सुक्ष्म आणि दीर्घकालीन नियोजन करण्यात आले. यामध्ये शाश्‍वत सिंचनासाठी ८४ हजार कोटी रूपयांच्या निधीतून दोन नदी जोड प्रकल्प यशस्वी केला. यामुळे गेल्या ८ वर्षांत तेलंगणाचे तिप्पट क्षेत्र सिंचनाखाली आले. शेती सिंचनाखाली येऊन उपयोग नव्हती तर पिके घेण्यासाठी सरकारने खरीप आणि रब्बी हंगामासाठीच्या खते बियाण्यांसाठी प्रति एकर १० हजार रूपये शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर जमा केले.

यानंतर राज्य स्थापनेपूर्वी केवळ तीन तास असलेला वीज पुरवठा २४ तास आणि मोफत केला. तर पिक काढणीनंतर हमीभावाने खरेदी करण्यासाठी ७ हजार खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या विविध शाश्‍वत उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ९९ टक्के थांबल्याचंही कदम यावेळी म्हणाले.

BRS News
Shivrajyabhishek Sohla at New Shahu Palace: शिवराज्याभिषेक दिन यावर्षीपासून कोल्हापूरच्या राजवाड्यातही साजरा होणार !

तेलंगणा(Telangana Pattern)मधील विद्यार्थी इतर राज्यामध्ये शिक्षण घेत असला तरी त्याचे शैक्षणिक शुल्क तेलंगणा सरकार भरत आहे. तसेच गर्भवती महिलांसाठी ९ महिन्यांचा पौषिक आहार सरकार करत असून, मुल जन्माला आल्यानंतर मुलाच्या नावावर १० हजार ११६ तर मुलीच्या नावावर १२ हजार ११६ रूपयांची मदत केली जाते. असेही देशमुख यांनी सांगितले. या सर्व योजना लोकहिताच्या असल्याने मराठवाड्यातील नागरिक तेलंगणा मध्ये जाण्याच इच्छुक असल्याचंही यावेळी ते म्हणाले.

लवकरच महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री...

आम्ही महाराष्ट्रात काम सुरू केल्यापासून एका महिन्यात १ लाख ८८ हजार सभासद नोंदणी झाली आहे. आमच्या पक्षाकडे शेतकऱ्यांचा येण्याचा वेग पाहता आम्ही लवकरच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभा लोकसभा निवडणुकीत विजयी होऊ असा विश्‍वास माणिक कदम यांनी व्यक्त केला आहे. तसेच २८८ मतदारसंघात आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत. आमच्या कामगिरीवर लवकरच महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री असेल असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

BRS News
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi : मुंबई महापालिकेपासूनच आघाडीत बिघाडी होणार..

भाजपाच्या सर्वेक्षणात ५० लाख मतं...

छत्रपती संभाजीनगरला झालेल्या के चंद्रशेखरराव यांची विक्रमी सभेचा धसका भाजपाने घेतला असून या सभेनंतर भाजपा(BJP)ने केलेल्या सर्वेक्षणात बीएसआरला राज्यात ५० लाख मतं मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या सर्वेक्षणाची धास्ती भाजपाने घेतली आहे. तसेच याचमुळे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रूपये देण्याची घोषणा केल्याचा दावा माणिकराव कदम यांनी यावेळी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com