धक्कादायक : पुण्यात महिला पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

शिल्पा चव्हाण (Shilpa Chavan) या शहर पोलिस दलात गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell) प्रभारी म्हणून काम पहात होत्या.
Police PI Shilpa Chavan

Police PI Shilpa Chavan

Sarkarnama

Published on
Updated on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पोलिस दलातील कर्मचीरी व अधिकारी यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होतांनी दिसत आहे. अशीच घटना पुण्यातील पोलिस दलात घडली आहे. पुणे शहर पोलिस दलाच्या (Pune Police) गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण (Police Inspector Shilpa Chavan) यांनी शुक्रवारी सकाळी (ता.31 डिसेंबर) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell) प्रभारी म्हणून काम पहात होत्या.

<div class="paragraphs"><p>Police PI Shilpa Chavan</p></div>
PSI साठी 70 हजारांची लाच घेणारा पंटर 'एसीबी'च्या जाळ्यात

गेल्या काही महिन्यांपुर्वीच चव्हाण यांची गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. गुन्हे शाखेत नेमणूक होण्यापुर्वी शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या. त्यांनी आत्महत्या केल्याने पुणे शहर पोलिस दलासह संपूर्ण राज्यातील पोलिस दलात मात्र खळबळ उडाली आहे.

<div class="paragraphs"><p>Police PI Shilpa Chavan</p></div>
IPS कृष्ण प्रकाश यांनी गुंडांवर झाड फेकून मारले.. ही पिक्चरची स्टोरी की खरेच तसे घडले?

दरम्यान, चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबातचे कारण मात्र, अद्याप समोर आलेले नाही. चव्हाण यांनी विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर भागात आपल्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी त्यांना आणण्यासाठी घरी गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही त्या फोन उचलत नसल्याने त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. त्यांना एक मुलगा असून, तो गावी गेला होता. त्या घरी एकट्याच असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे मात्र पुणे पोलिसांत खळबळ उडाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अद्याप मिळाली नसून तपासानंतरच माहिती समोर येईल, असे सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com