IPS कृष्ण प्रकाश यांनी गुंडांवर झाड फेकून मारले.. ही पिक्चरची स्टोरी की खरेच तसे घडले?

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (PCMC Police) सांगितलेल्या कथेवर काही प्रश्न विचारण्यात येत आहेत.
IPS Krishna Prakash

IPS Krishna Prakash

Sarkarnama

Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एका चकमकीत गुंडांना झाड फेकून मारल्याच्या घटनेचे बरेच पडसाद उमटत आहेत. त्याविषयी अनेक प्रतिप्रश्न सोशल मिडियात विचारले जात आहेत.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता.२६) मध्यरात्री चाकण (ता.खेड, जि .पुणे) येथे पिंपरी-चिंचवड पोलिस आणि तीन गुंडात चकमक उडाली. दोन्ही बाजूंकडून दोन-दोन गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, त्यातील एकही गोळी कोणाला लागली नाही. या चकमकीत गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने यांना पोलिसांनी पकडले. मात्र आयुक्तांनी त्यांना झाड फेकून मारल्याने ते पडले आणि पकडले गेल्याचा दावा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला होता. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

IPS Krishna Prakash

योगेश जगताप हत्याप्रकरणातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; तिघांना अटक

``पोलिस पथकावर गोळीबार करून पळणाऱ्या तीन आरोपींवर कृष्ण प्रकाश यांनी प्रसंगावधान राखत तेथे पडलेले 8 ते 10 फूट उंचीचे आणि मोठा बुंदा असलेले झाड त्यांच्या अंगावर फेकले. त्यामुळे आरोपी खाली पडून पोलिसांच्या तावडीत सापडले. यावेळी सशस्त्र गुंडांशी झटापट करून त्यांना आयुक्तांनी निशस्त्र केले. या झोंबाझोंबीत त्यांना किरकोळ खरचटले,`` अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांनी दिली होती. हे फेकून मारलेले झाडही पोलिसांनी पत्रकारांना दाखविले.

पोलिसांनी दाखविलेले हेच ते झाड

पोलिसांनी दाखविलेले हेच ते झाड

Sarkarnama

याबाबत विनय काटे यांनी फेसबुकवर काही प्रश्न विचारले आहेत.

1) 8-10 फूट उंच, जाड बुंध्याचे झाड मुळापासून उपटून फेकून मारले की ते झाड आधीच तिथे कुणी कापून ठेवले होते?

2) झाड आरोपींना समोरून फेकून मारले की मागून? समोरून झाड फेकून मारले तर आरोपी यांच्या दिशेने का पळत होते?

3) तीन आरोपी जिवाच्या आकांताने किंवा आक्रमकपणे डोंगराकडे पळत असताना ते एकमेकांना चिकटून, हातात हात गुंफून तर पळत नसतील. थोडे तरी अंतर असेल त्यांच्यात. त्यावेळी त्यांचा एकूण विस्तार नक्कीच 8-10 फुटांपेक्षा जास्त असेल. मग एकाच झाडात तिघे कसे खाली पडले?

4) तिन्ही आरोपी पळताना एखादा तरी आरोपी बाकी दोघांच्या पुढेमागे असेलच. तरीही झाड एकाच वेळी तिघांना कसे लागले असावे?

5) दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन-दोनच गोळ्या का झाडल्या असाव्यात? एका तरी बाजूने जास्त गोळ्या चालाव्या ना?

6) डोंगराकडे वरच्या दिशेने पळत जाणाऱ्या लोकांवर 8-10 फुटांचे, मोठा बुंदा असलेले झाड (15-20 किलो वजनाचे) गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध, खालून वरच्या दिशेने फेकून मारून तीन माणसांना एका टप्पुत आडवे पाडणे हे सामान्य माणसाचे काम वाटते का?

असो... जर बालपणी शेठजी मगर पकडू शकतात तर ह्या देशात सध्या काहीही शक्य आहे. कुणी आश्वासन फेका, कुणी झाड फेका... आम्ही झेलत राहू

अशी तिरकस काॅमेन्ट काटे यांनी शेवटी केली आहे.

IPS Krishna Prakash

गोळीबार करून पळणाऱ्या गुंडांवर कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकून मारले आणि....

त्यांच्या या फेसबुक पोस्टवर आणखीन पुणेरी ठसका असलेल्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे

संजय झिंझाड म्हणतात, ``डॅा. विनय काटे, मिथुनच्या चित्रपटात सायकलने बंदुकीच्या गोळ्या अडवतात ते चालतं तुम्हाला. इथं झाड फेकुन मारुन गुंड पकडलेले दाखवलंय तेसुध्दा पचत नाही तुम्हाला. इथं एवढा भारी स्क्रीप्ट रायटर भेटलाय. विनय काटेंना पण त्यावर पोस्ट लिहावी वाटली. यातच या चित्रपटाचं सगळं यश आहे.

ओंकार लोखंडे यांनी मिडिया काहीपण छापते असे म्हणून यात कृष्णप्रकाश यांचा काय दोष, असा सवाल विचारला आहे. सामान्य माणसांच्या छोट्या मोठ्या तक्रारीला फोनला रिप्लाय देतात. सुनील टोनपे हे पण चांगले ऑफिसर आहेत माझ्या शेजारी राहतात, down to earth आहेत, असे मत व्यक्त केले आहे.

अद्वेैत मेहता यांनी रजनीकांत आणि इतरांचे साऊथ / हिंदी मारधाड सिनेमे बघताना हे प्रश्न पडतात का?समाजात जे घडतं त्याचं प्रतिबिंब सिनेमात उमटतं कधीकधी. उलटही होऊ शकतच की. एक झाड 2 पक्षी किंवा एका दगडात 2 पक्षी हे जुनं झालं आता. एका झाडात 3 आरोपी, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com